JOIN US
मराठी बातम्या / Viral / फक्त 1000 रुपयांसाठी Ambulance driver चं Pregnant महिलेसोबत धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO

फक्त 1000 रुपयांसाठी Ambulance driver चं Pregnant महिलेसोबत धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO

प्रेग्नंट महिलेसोबत असं संतापजनक कृत्य करणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर कारवाई करण्याची मागणी होते आहे.

जाहिरात

अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचं प्रेग्नंट महिलेसोबत संतापजनक कृत्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 05 सप्टेंबर : अ‍ॅम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनीच असते. पण याच अ‍ॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने एका प्रेग्नंट महिलेसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. फक्त हजार रुपयांसाठी या ड्रायव्हरने या महिलेसोबत असं काही केलं आहे, की त्याबाबत संताप व्यक्त केला जातो आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या हरिमपूरमधील पंधरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक प्रेग्नंट महिला बसलेली असल्याचं दिसतं आहे. तिला प्रसूती वेदना होत आहेत. तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत. तर पुढे एक अॅम्ब्युलन्स तिथून जाताना दिसते आहे. आता ही अॅम्ब्युलन्स  या महिलेला घेऊन जाईल असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात वेगळंच काही घडतं. ही अ‍ॅम्ब्युलन्स त्या महिलेला न्यायला नव्हे तर तिला सोडून जाते आहे. हे वाचा -  महिला पोलिसाकडून सासऱ्याला बेदम मारहाण; पोलिसांसमोरच वृद्धाला कानशिलात लगावल्या, Shocking Video अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरने तशाच अवस्थेत रस्त्यावर सोडल्याचं सांगितलं जातं आहे. याचं कारण म्हणजे त्याने या महिलेच्या कुटुंबाकडे केलेली पैशांची मागणी. जे ते कुटुंब पूर्ण करू शकलं नाही.

संबंधित बातम्या

राजेश साहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे.  माहितीनुसार या रुग्णवाहिका चालकाने महिलेच्या कुटुंबाकडे 1000 मागितले. तरच रुग्णालयात पोहोचवू असं सांगितलं. पण कुटुंबाकडे तितके पैसे नव्हते, त्यामुळे ते चालकाला तितके पैसे देऊ शकले नाही. म्हणून त्याने प्रेग्नंट महिलेला रस्त्यात सोडलं आणि तो तिथून निघून गेला. हे वाचा -  VIDEO: बालाजीच्या दर्शनासाठी अभिनेत्रीचा राडा; 10 हजार मागितले अन् नको तिथं स्पर्श केल्याचे गंभीर आरोप हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. या अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या