JOIN US
मराठी बातम्या / Viral / FACT CHECK : तबलिगीवरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी थेट अमित शहांना विचारले कठोर प्रश्न?

FACT CHECK : तबलिगीवरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी थेट अमित शहांना विचारले कठोर प्रश्न?

केंद्रीय गृहमंत्र्यांनी मरकजला परवानगी कशी दिली यासह अनेक प्रश्न विचारणारं पत्र व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या लेटरहेडवर असलेलं हिंदी आणि मराठी भाषेत हे पत्र आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 एप्रिल : देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. यातच दिल्लीत निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशातील अनेक राज्यांत याचा प्रादुर्भाव झाला. तबलिगींनी त्यांची माहिती लपवून ठेवल्यानंही कोरोनाच्या रुग्णांची संख्या अनेक ठिकाणी झपाट्यानं वाढली. यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनावरून दिल्लीतल्या केजरीवाल सरकारवर आणि केंद्रावरही आरोप केले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात याच कार्यक्रमाच्या आयोजनाला महाराष्ट्र सरकारनं परवानगी नाकारली होती. मात्र दिल्लीत केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्यानं मरकजला परवानगी कशी दिली असा प्रश्न विचारणारं पत्र व्हायरल होतं आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या लेटर हेडवर असेललं हे पत्र हिंदी आणि मराठी भाषेत आहे. पत्रामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारवर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मरकजच्या शेजारीच पोलिस स्टेशन असताना आयोजन थांबवलं का नाही? यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा प्रश्न त्यात आहे. याशिवाय इतरही अनेक प्रश्न या पत्रात विचारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ‘तब्लिगी जमात’च्या कार्यक्रमाला सरकारने रोखलं. मात्र दिल्लीत मरकजच्या शेजारीच पोलिस स्टेशन असताना आयोजन थांबवलं का नाही? मरकजमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व राज्यात झाला, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का?  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दोन वाजता मरकजमध्ये पाठवलं. हे काम डोवाल यांच नसून दिल्ली पोलिस आयुक्तांचं आहे. अजित डोवाल आणि तब्लिगीचे मौलाना साद दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त मंथन करत होते? असंही पत्रात लिहिलं आहे.

संबंधित बातम्या

अनिल देशमुख यांनी तबलिगींबाबत मंगळवारी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये मरकजमध्ये सहभागी झालेल्या काही लोकांचे फोन ऑफ लागत आहेत आणि त्यांनी लवकर संपर्क साधावा असं म्हटलं होतं. अनिल देशमुख यांना या पत्राबाबत विचारलं असता त्यांच्याकडून अधिकृत अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हे वाचा : कोरोनाशी लढण्यासाठी US, UK सह 18 देशांनी मोदींना केलं प्रमुख? मेसेज होतोय VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या