JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'हे' 2 देश वगळता इतर कोणत्याच देशाच्या राष्ट्रध्वजात नसतो जांभळा रंग; कारण वाचून व्हाल चकित

'हे' 2 देश वगळता इतर कोणत्याच देशाच्या राष्ट्रध्वजात नसतो जांभळा रंग; कारण वाचून व्हाल चकित

जगभरात अनेक लहान मोठे देश (Countries) आहेत. त्यांचे प्रत्येकाचे राष्ट्रध्वज (National Flags) ठरलेले आहेत. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, अस्तित्व, वेगळेपण, समृद्धीचं आणि अभिमानाचं प्रतीक असतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर-    जगभरात अनेक लहान मोठे देश  (Countries)  आहेत. त्यांचे प्रत्येकाचे राष्ट्रध्वज   (National Flags)  ठरलेले आहेत. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, अस्तित्व, वेगळेपण, समृद्धीचं आणि अभिमानाचं प्रतीक असतं. राष्ट्रध्वजाची रचना, आकार आणि रंग यामागे प्रत्येक देशाचे काही संकेत असतात. आपल्या तिरंग्यातील हिरवा रंग निसर्गाशी, मातीशी असलेलं नातं दाखवतो. पांढरा रंग सत्य, शांती आणि पावित्र्य दर्शवतो, तर केशरी रंग हा सर्वसंगपरित्याग, साहस आणि बलिदानाचं प्रतीक आहे. मध्यभागी असणारे अशोकचक्र धर्म किंवा सदाचरण तसंच प्रगतिशील चळवळीचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक देशाच्या ध्वजातून त्या देशाची अस्मिता ध्वनित होत असते. त्यामुळे जगभरातील अनेक देशांचे वेगवेगळे ध्वज पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. मात्र असे विविध देशांचे ध्वज पाहताना एक गोष्ट कधी तुमच्या लक्षात आली आहे का? वेगवेगळ्या राष्ट्रध्वजांमध्ये नानाविध रंग असतात; पण जांभळा रंग  (Purple Colour)  नसतो. राष्ट्रध्वजाच्या बाबतीत हा रंग अत्यंत दुर्मीळ मानला जातो. जगात डॉमिनिका  (Domnica)  आणि निकाराग्वा  (Nikargua)  हे दोनच देश असे आहेत ज्यांच्या राष्ट्रध्वजात जांभळा रंग आहे. टीव्ही9ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. वर्ल्ड अॅटलसच्या   (World Atlas)  अहवालानुसार, एक काळ असा होता जेव्हा जांभळा रंग हा अतिशय दुर्मीळ (Rare Colour) मानला जात होता. सोन्यापेक्षाही तो महाग होता. कारण त्या काळी जांभळा रंग हा एका विशिष्ट प्रकारच्या सागरी गोगलगायींपासून तयार केला जात असे. या गोगलगायी लेबनॉनमधील समुद्रातच आढळत. एक ग्रॅम जांभळा रंग तयार करण्यासाठी 10 हजारांहून अधिक गोगलगायी माराव्या लागत. त्यामुळे त्याची किंमतही प्रचंड होती. 1 पौंड जांभळा रंग खरेदी करण्यासाठी 41 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असे. त्यामुळे राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी जांभळा रंग वापरला जात नसे. (हे वाचा: इथे दिसलं पांढरं इंद्रधनुष्य, नागरिक झाले अवाक ) त्याचप्रमाणे 1800 च्या दशकात, जांभळा रंग खरेदी करणे हा श्रीमंतांचा छंद होता. यामुळेच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांनी राजघराण्याव्यतिरिक्त कोणालाही जांभळ्या रंगाचे कपडे वापरण्याची परवानगी नसल्याची घोषणा केली होती. त्यामुळेही जांभळा रंग सर्वसामान्यांपासून दूर होता. असा हा दुर्मीळ जांभळा रंग सर्वसामान्यांच्या आयुष्यात आला तो विल्यम हेन्री पर्किन यांच्यामुळे. 1856 मध्ये, विल्यम हेन्री यांनी कृत्रिमरित्या जांभळा रंग तयार करण्यात यश मिळवलं, त्यामुळे या रंगाची किंमत आणि दुर्लभता कमी झाली आणि हळूहळू जांभळा रंग सर्वसामान्यांच्या आयुष्यातही रंग भरू लागला. त्यानंतर डॉमिनिका या देशाने 1978 मध्ये आपला राष्ट्रध्वज तयार केला तेव्हा त्यात जांभळ्या रंगाचा वापर केला तर 1908मध्ये निकाराग्वा या देशाने आपल्या राष्ट्रध्वजात हा रंग समाविष्ट केला. त्यामुळे आज जगातील 195 देशांपैकी डॉमिनिका आणि निकाराग्वा या दोनच देशांच्या राष्ट्रध्वजात जांभळा रंग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या