JOIN US
मराठी बातम्या / Viral / दिसतो श्वान पण शरीर बिबट्यासारखं; कोण आहे हा खतरनाक आणि विचित्र प्राणी?

दिसतो श्वान पण शरीर बिबट्यासारखं; कोण आहे हा खतरनाक आणि विचित्र प्राणी?

कुत्रा आणि बिबट्या किंवा चित्त्यासारख्या दिसणाऱ्या या प्राण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : प्रत्येक प्राण्याचं खास वैशिष्ट्य असतं, ज्यामुळे ते प्राणी एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात आणि त्यावरून आपण त्यांना ओळखतो. पण सध्या सोशल मीडियावर असा प्राणी चर्चेत आला ज्याला आपण कधीच पाहिलं नाही आहे. हा प्राणी दिसायला श्वानासारखा आहे, पण त्याचं शरीर मात्र बिबट्या आणि चित्त्यासारखं आहे. खरंतर तो त्यांच्यापेक्षाही खतरनाक वाटतो आहे. या विचित्र प्राण्याला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (Dog look like cheetah). एका व्यक्तीने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला. प्राण्याच्या मालकाने रेडिट साइटवर हा फोटो टाकला आणि तो व्हायरल  झाला. त्यानंतर स्थानिक वृत्तसंस्थेनेही याचं रिपोर्टिंग केलं आणि त्यानंतर हळूहळू अनेक लोकांचं लक्ष या प्राण्याने वेधून घेतलं. याने सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं.  कुत्रा आणि चित्ता या दोघांसारखा दिसणारा हा प्राणी नेमका कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढली. हे वाचा -  कांगारूने लाथेने उडवलं आणि…; श्वानांना वाचवताना तरुणाचं काय झालं पाहा VIDEO @FotosGab ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट करत दिलेल्या माहितीनुसार हा टायटस डॉग आहे. हा चित्ता नाही तर एक श्वान आहे, जो पिटबुल डॉगसारखा दिसतो. टायटस डॉगबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे.  झी न्यूज हिंदी ने साइन्स क्लब वेबसाइटच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याचं खरं नाव टाइटस आहे आणि तो शिकारी श्वान नाही. हा जगातील सर्वात दुर्मिळ पिटबुल डॉग आहे.

संबंधित बातम्या

हा खरंच टायटस डॉग आहे, याबाबत काही लोकांनी शंका व्यक्ती केली आहे. कारण ज्या व्यक्तीने हा फोटो पोस्ट केला आहे, त्याने फक्त एकच फोटो पोस्ट केला. तो एखाद्या ग्रुमर सलूनमध्ये बसला असावा असाच दिसत होता. तसंच टाइटस एक अल्बानियाई पिट बुल आहे, ज्याच्या प्रजाती आता अस्तित्वात नाही, असंही या व्यक्तीने पोस्टमध्ये सांगितलं. हे वाचा -  सोपी शिकार समजून गरूडाने केला सापावर हल्ला; पण बाजी पलटली अन्…, Shocking Video तज्ज्ञांच्या मते, या म्युटेशनला नैसर्गिक मानू शकत नाही. असं करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोकांनी पिटबुल डॉगवर पेंटिंग केल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या