बंगळुरू 12 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ आपल्याला नेहमीच आश्चर्यचकीत करत असतात. सध्या असाच एका डॉक्टरचा व्हिडीओ समोर आला आहे. जो अवघ्या काही वेळातच ट्रेंड होऊ लागला आहे. हा व्हिडीओ बंगळुरूमधील एका डॉक्टरचा आहे. जो आपल्याला रस्त्यावर धावताना दिसत आहे. आता तसे पाहाता तुम्हाला हा व्हिडीओ अगदी सामान्य वाटेल. ज्यामध्ये एक व्यक्ती धावत आहे, परंतू तो का धावत आहे? हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहाणार नाही. हा रस्त्यावरुन धावणारा व्यक्ती एक डॉक्टर आहे, त्याची गाडी ट्राफीक जाममध्ये अडकली, ज्यामुळे त्याला हॉस्पीटलला पोहोचायला उशीर झाला आहे. ज्यामुळे तो आपली गाडी तशीच ठेवून धावत हॉस्पीटलला पोहोचत आहे. हे वाचा : 7 सप्टेंबरची मुंबईतील ‘ती’ अनपेक्षित 15 मिनिटं; प्रत्यक्ष दिसलं नाही ते कॅमेऱ्यात कैद; थक्क करणारा VIDEO गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, डॉक्टरांने सांगितले की, तो ट्राफीक जाममध्ये अडकला होता. खूप वेळापासून गाडी जागची हलली नाही, त्यामुळे त्याला तेथून पायी निघण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या डॉक्टरांना कनिंगहॅम रोडवरून सर्जापूर येथील मणिपाल हॉस्पिटल गाठावे लागले. तेथे त्यांना एमरजन्सी ऑपरेशन होतं. यानंतर त्यांनी गुगल मॅप तपासला, तेव्हा त्यांना लक्षात आले की, या जाममुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे जास्त लागणार आहे. तेव्हा मग त्यांनी गाडी आणि ड्रायव्हर सोडून तेथून निघून पळ काढला. हे वाचा : Reels बनवणं तरुणांना पडलं महागात, व्हिडीओ काढताना केली अशी गोष्ट, आता जावं लागणार तुरुंगात रिपोर्टनुसार, डॉक्टरांचा पेशंट शस्त्रक्रियेसाठी आधीच हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि इतर पेशंटही डॉक्टरची वाट पाहत होते. तेव्हा डॉक्टर ट्राफिक जॅममधून त्यांच्या गाडीतून उतरले आणि सुमारे तीन किमी अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तो धावू लागला.
यादरम्यान त्याने आपल्या फोनवरून एक व्हिडीओही बनवला आहे आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. ज्याचे लोकंनी भरभरुन कौतुक केले होते. लोकांनी या व्हिडीओला खूप लाईक्स आणि शेअर देखील केला आहे.