महिलेच्या तोंडात साप.
मुंबई, 14 नोव्हेंबर : झोपेत कुणाच्या अंगावर झुरळ आलं, कुणाला उंदीर चावला हे तुम्ही ऐकलं असेल. झोपेत एखाद्याच्या अंथरूणात किंवा अंगावर साप आला इतपतही ठिक आहे. पण तो साप त्या व्यक्तीच्या तोंडातही गेला…. फक्त वाचूनच तुमच्या अंगावर काटा आला असेल. धक्कादायक म्हणजे साप तोंडात गेला तरी त्या व्यक्तीला समजलं नाही. एका महिलेसोबत असं घडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक महिला झोपली असताना तिच्या तोंडात साप गेला. तब्बल 4 फूट लांबीचा हा साप. ही महिला इतकी गाढ झोपली होती की साप तिच्या तोंडात घुसला तरी तिला समजलं नाही. जेव्हा समजलं तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी साप तिच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओत पाहू शकता महिला झोपली आहे आणि डॉक्टर एका खास स्टिकमार्फत तिच्या तोंडातून साप काढत आहेत. बऱ्याच वेळानंतर कसंबसं त्या सापाला महिलेच्या तोंडातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं. हे वाचा - अरे बापरे! दारूच्या नशेत माशांऐवजी महाकाय अजगराला धरलं आणि पुढे भयंकर घडलं; Watch Video व्हिडीओ पाहताना आपल्यालाही अंगावर काटा येतो. सापाला तोंडाबाहेर काढल्यानंतर त्याला पाहून डॉक्टरही घाबरले, त्यांनाही घाम फुटला. साप खूपच लांब होता. हा साप आपल्याला चावेल अशी भीती त्यांना वाटत होती.
सापाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसावा. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @FascinateFlix ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - बेडवर अचानक झाली हालचाल; महिलेने टॉर्च पेटवताच 2 डोळे चमकले आणि… यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या व्हिडीओत साप तोंडातून बाहेर काढताना तर दाखवण्यात आला आहे. पण हा साप तिच्या तोंडात घुसला कसा, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, किंवा तुमच्याकडे अशा काही विचित्र घटनेचा अनुभव किंवा माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.