JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातील सगळ्यात महागडी कॉफी, ती ज्या पदार्थापासून बनते, हे तुम्हाला कळलं तर कदाचित तुम्ही ती फ्रीमध्ये ही पिणार नाहीत

जगातील सगळ्यात महागडी कॉफी, ती ज्या पदार्थापासून बनते, हे तुम्हाला कळलं तर कदाचित तुम्ही ती फ्रीमध्ये ही पिणार नाहीत

तरुणांनो तुमच्यासाठीच… तुम्ही स्वत:ला साहसी, एडवेंचरस म्हणत असाल, तर ‘या’ कॉफीला पिण्याचं चॅलेज तुम्ही स्वीकारणार?

जाहिरात

सोर्स : गुगल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : चहा आणि कॉफी हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. ज्यामुळे लोक याला कोणत्याही वेळी प्यायला तयार होतात. काहीजण तर अगदी जेवणानंतर देखील चहा किंवा कॉफी घेतात. तर अनेक लोक आपल्या मित्रांना, नातेवाईकांना भेटले तरी चहा किंवा कॉफी एकत्र पितात. त्यात तरुणाई तर कॉलेजच्या कट्टयापासून ते ऑफिसच्या कॅन्टिंगपर्यंत चहा कॉफीसाठी एकत्र भेटतात आणि येथेच त्यांच्या गप्पा रंगतात.

तसे पाहाता आजच्या यंग पिढीला नवनवीन गोष्टी करण्याची आवड आहे. त्यांना नेहमीच अशा काही गोष्टी करायला आवडतात, ज्या सर्वच लोक करत नाहीत. म्हणून मग ते अनेक गोष्टी एक्स्प्लोर करायला बाहेर पडतात. तसेच ते साहसी गोष्टी देखील करु पाहातात. तुम्हाला देखील असं काहीतरी साहसी करायची इच्छा असेल तर एक गोष्ट तुम्ही नक्की करु शकता. म्हणजे हे एडवेंचर तसं शारीरीक नाही, पण मानसिक असल्याचे तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच काय तर तुम्हाला यासाठी फारसं काही करायचं नाही, पण तुम्हाला एक कॉफी प्यायची आहे. आता कॉफी म्हटलं तर तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? घेऊ की कॉफी…. पण जरा थांबा… हे चॅलेंज आहे, म्हटल्यावर काहीतरी ट्वीस्ट त्यात नक्कीच असणार…. ही कॉफी ज्या गोष्टीपासून बनलीय, ती जर तुम्ही ऐकलात, तर तुम्ही ही कॉफी पिणार देखील नाही. हो, कारण ही कॉफी मांजरीच्या विष्टेपासून बनवली आहे. बसला ना 440 वोल्टचा झटका? आश्चर्याची गोष्ट अशी की या कॉफीला खूप मागणी आहे आणि लोक याला आवडीने पितात. या कॉफीला कोपी लुवाक (kopi luwak) असं म्हणतात आणि या एक कप कॉफीची किंमत 6 हजार रुपये आहे. चला या कॉफीबद्दल आणखी माहिती घेऊ. सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

सिव्हेट मांजरीच्या विष्ठेपासून तयार केलेल्या या कॉफीला मांजरीच्या नावावरून सिव्हेट कॉफी असेही म्हणतात. ही मांजराची एक प्रजाती आहे पण तिला माकडासारखी लांब शेपटी असते. पण शेवटी कॉफीसारखे पेय मांजराच्या पोटी कसे तयार करता येईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असेल? वास्तविक असे घडते की या सिव्हेट मांजरीला कॉफी बीन्स खायला आवडते. ते कॉफी चेरी फक्त कच्च्या स्वरूपात खातात. चेरीचा लगदा पचला जातो, परंतु मांजरींना ते पूर्णपणे पचणे शक्य नाही कारण त्यांच्या आतड्यांमध्ये असे पाचक एंजाइम नसतात. अशा परिस्थितीत, असे होते की मांजरीच्या विष्ठेसह, कॉफीचा न पचलेला भाग देखील बाहेर येतो. अशा प्रकारे कॉफी बनवली जाते सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

यानंतर हा भाग शुद्ध केला जातो, सर्व प्रकारच्या जंतूपासून तो मुक्त केल्यानंतर, त्यावर पुढील प्रक्रिया होते. या दरम्यान, बीन्स धुऊन भाजल्या जातात आणि नंतर कॉफी तयार होते. मग आता प्रश्न असा येतो की, फक्त मांजराच्या विष्ठेपासून बीन्स घेण्याची काय गरज आहे! ते थेट तयार देखील केले जाऊ शकते. पण तसं नाही. हे बीन्स मांजरीच्या शरीरातील आतड्यांमधून गेल्यानंतर अनेक प्रकारचे पाचक एन्झाईम एकत्र होतात, ज्यामुळे ते अधिक चवदान बनते आणि त्याचे पौष्टिक मूल्यही अनेक पटींनी वाढते. मग आता तुम्ही ही कॉफी पिण्याचं साहस करणार की नाही?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या