JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : TV डिबेटमध्ये बोलू दिलं नाही; Live असतानाच महिला पॅनलिस्टचं विचित्र कृत्य

VIDEO : TV डिबेटमध्ये बोलू दिलं नाही; Live असतानाच महिला पॅनलिस्टचं विचित्र कृत्य

अनेकदा टीव्हीवरील चर्चेदरम्यान इतकी जणं असतात की, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडताच येत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 जानेवारी : तुम्ही टीव्हीवर विविध प्रकारच्या चर्चा पाहिल्या असतील. यामध्ये विविध पक्षाचे प्रवक्ते, नेता सामील होतात आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. यादरम्यान अनेक प्रवक्ते त्यांना बोलू दिलं जात नसल्यानं अँकरवर आरोप लावतात.  सोशल मीडियावर (Social Media) लाइव टीवी डिबेटचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या खूप व्हायपल होत आहे. हा मजेशीर व्हिडीओ लोक शेअर करीत आहेत. लाइव डिबेटदरम्यान डान्स करू लागली महिला पॅनलिस्ट व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका टीवी चॅनलवर अँकर व्यतिरिक्त अनेक पॅनलिस्ट बसलेले आहेत. एका मुद्द्यावरुन ते आपआपल्या पक्षात मत व्यक्त करीत आहेत. यादरम्यान एक महिला पॅनलिस्ट डान्स करू लागते. महिला पॅनलिस्टचा आरोप आहे की, लाइव्ह डिबेटदरम्यान तिला बोलण्याची संधी दिली नव्हती. यामुळे ती लाइव्ह टीव्हीवर डान्स करू लागली. हे ही वाचा- Shocking video! कुत्राही असं काही करू शकतो; त्याचं खतरनाक रूप CCTV मध्ये कैद व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हिरव्या रंगाचे कपडे घातलेली एक महिला पॅनलिस्ट लाइव्ह डिबेटदरम्यान डान्स सुरू करते. याशिवाय चेहऱ्यावर विचित्र हावभाव करते. लोकांचं लक्ष तिच्याकडे जावं यासाठी महिला असं करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पॅनलिस्ट बोलण्याचा प्रयत्न करीत असताना तिला अँकर बोलू देत नव्हता.

महिला पॅनलिस्टला बोलण्याची मिळत नव्हती संधी.. मीडिया रिपोर्ट्स नुसार, महिला पॅनलिस्टचा आरोप आहे की, चर्चेत भार घेणारे दुसरे गेस्टदेखील त्यांना बोलू देत नव्हते.

यानंतर त्यांनी लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत करण्यासाठी विचित्र पद्धतीचा अवलंब केला. तिने सांगितलं की, याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. यासाठी लाइव्ह डिबेटदरम्यान ती उभं राहून डान्स करू लागली. हा व्हिडीओ Elizabeth नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या