आज आम्ही तुमच्यासाठी दंतविषयक काही आश्चर्यकारक तथ्यं (amazing dental facts) घेऊन आलो आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसेल. पण ते माहीत झाल्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या दात आणि तोंडाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल.
दंतचिकित्सा (Dentistry) वर्षानुवर्षे जुनी आहे. ही दात आणि तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित आहे. बरेच लोक दातांची काळजी अजिबात घेत नाहीत. याचा परिणाम असा होतो की, त्यांचे दात लवकर खराब होऊ लागतात किंवा त्यांना तोंडाशी संबंधित इतर समस्या होऊ लागतात. जाणून घ्या, काही आश्चर्यकारक तथ्यं(Amazing dental facts), जी माहीत झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दात आणि तोंडाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल. (सर्व फोटो : Canva)
1. टूथ इनॅमल म्हणजे दातांवर एक पातळ आवरण असतं, ज्यामुळे आपले दात सुरक्षित राहतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दातांचा हा थर खूप मजबूत असतो. जर तुम्हाला विचारले की शरीरात सर्वात कठीण गोष्ट कोणती आहे, तर बहुतेक जण 'हाडं' असं उत्तर देतील. पण सत्य हे आहे की, दातांवरील थर म्हणजेच टूथ इनॅमल हा मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ (Hardest Substance in the Human Body) आहे. एनॅमलला मोहस हार्डनेस स्केलच्या (Mohs Hardness Scale) आधारे 5 गुण दिले जातात. जे स्टीलइतकेच आहेत. म्हणजेच, हे टुथ इनॅमल तितकंच कठीण असतं.
2. ब्रश केल्यानंतरही तुमच्या तोंडात 700 हून अधिक प्रजातींचे बॅक्टेरिया आढळतात हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. यासोबत तुमच्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, प्रत्येक जीवाणू तोंड किंवा शरीरासाठी हानिकारक नसतो. काही बॅक्टेरिया देखील चांगले असतात. आपल्या पचनसंस्थेत चांगले बॅक्टिरिया असणं खूप गरजेचं आहे. आपल्या दातांवर प्लेक जमा होणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा एक प्रकारचा बॅक्टेरियाचा थर आहे. या प्लेकमधील जीवाणू आम्लासारखे पदार्थ बनवतात, जे दात किडवण्याचं काम करतात. तेव्हा, ब्रश करणं खूप महत्त्वाचं आहे.
3. अनेकदा लोक नवीन टूथब्रश विकत घेतात, तेव्हा ते त्याच्या प्लास्टिकच्या केसमध्ये (Toothbrush case) तो बंद करून ठेवतात. त्यांचा दावा असतो की, अशा प्रकारे बॅक्टेरिया ब्रशला चिकटणार नाहीत आणि तो ब्रश घाण होणार नाही. पण रिपोर्ट्सनुसार, हे प्लास्टिक केस ब्रशसाठी फायदेशीर असण्यापेक्षा जास्त हानिकारक आहेत. याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की, त्यांना इतकी कमी छिद्र असतात की हवा नीट आत जाऊ शकत नाही, त्यामुळे ब्रशचा ओलावा सुकत नाही. यामुळे ब्रशवर बॅक्टेरिया सहज वाढू शकतात.
4. टुडेज डेंटल नावाच्या वेबसाइटनुसार, 25 टक्के लोक दिवसातून दोनदा दात स्वच्छ (How to clean teeth) करत नाहीत. यामुळे त्यांचे दात पडण्याची शक्यता 33 टक्क्यांनी वाढते.
5. तुम्ही तुमच्या बोटांवर असलेले फिंगरप्रिंट पाहिले असतील आणि तुम्हाला हेदेखील माहीत असेल की, प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट वेगळे असतात. कोणत्याही दोन व्यक्तींचे फिंगरप्रिंट समान असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या दातांवर 'टूथ प्रिंट' (Facts about toothprint) असते. जगातील इतर कोणत्याही व्यक्तीचे दात, इनॅमल इत्यादींची मांडणी तुमच्या दातांसारखी असणार नाही.
6. आता सर्वात आश्चर्यकारक बाब! तुमच्या हे लक्षात आले असेल की, जेव्हा तुमचा आवडता पदार्थ तुमच्या समोर येतो तेव्हा तोंडाला पाणी सुटतं; म्हणजेच, तोंडात लाळ तयार होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, माणसाच्या तोंडात किती लाळ निर्माण होऊ शकते? (How much saliva do we produce in a lifetime) बीबीसीच्या सायन्स फोकस वेबसाइटनुसार, मानवी तोंडात नवीन लाळ तयार होण्यापेक्षा जुन्या लाळेचा पुनर्वापर केला जातो. कारण, आपण तीच लाळ तोंडात घोळवत आणि गिळत राहतो. पण लाळ तयार होण्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर, आपल्या तोंडात 1 तासात 30 मिली लाळ तयार होते, त्याचा दर अन्न खाताना जास्त आणि झोपताना कमी असतो. यानुसार एका सामान्य व्यक्तीच्या तोंडातून आयुष्यात 20 हजार लिटर लाळ तयार होते.
7. दंतचिकित्सेसंबंधित अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्यामुळे आता हे औषधशास्त्र (How old is dentistry) किती जुनं आहे, असा प्रश्नही निर्माण होतो. अमेरिकन डेंटल एज्युकेशन असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, सिंधू संस्कृतीच्या काळापासून दातांविषयी माहिती उपलब्ध आहे आणि तेव्हापासून त्याचे तज्ज्ञ सापडले आहेत. म्हणजेच, दंतचिकित्सेचं ख्रिस्तपूर्व 7000 वर्षांपासून अनुसरण केलं जात आहे.
8. तुमच्या तोंडाच्या एका बाजूला अन्न जास्त चघळण्याची सवय तुमच्या लक्षात आली आहे का? हे घडतं कारण, ही संपूर्ण प्रक्रिया मेंदूतून चालते. जर उजव्या हाताने कामं करणारे सहसा उजव्या बाजूने अन्न चावतात.
9. आणखी एक बाब म्हणजे कोणताही माणूस पूर्ण दात दाखवून हसू शकत नाही. हसताना आपले फक्त दोन तृतीयांश दात दिसतात. याचं कारण म्हणजे एक तृतीयांश दात हिरड्यामध्ये दडलेले असतात. कधीकधी त्यांची मुळं अजून खाली असतात.
10. ब्रशने दात स्वच्छ केल्याने त्यावर जमा होणारे बॅक्टेरिया साफ होतात. पण दातांच्या मध्ये जिथे ब्रश पोहोचू शकत नाही, तिथे बरेच बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. अशा परिस्थितीत, फ्लॉसिंग खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे. ही एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्यामध्ये दातांच्या योग्य साफसफाईसाठी ते त्यांच्या दरम्यान बारीक नायलॉनच्या दोऱ्यांनी स्वच्छ केलं जातं.