मुंबई 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या पाया खालची जमीनच सरकेल. साप म्हटलं की अनेकांना घाम फूटू लागतो. कारण तो एकदा का चावला की व्यक्तीचा प्राण देखील जातो. त्यात किंग कोब्रा हा सगळ्यात धोकादायक साप आहे. कारण याचं विष फार घातक आहे. त्याने एकदा दंश केला की, त्याच्यापासून वाचणं फारच कठीण आहे. अशात विचार करा की हा कोब्रा तुम्ही झोपेत असताना तुमच्या अंगावर येऊ बसला तर? ज्याचा आपल्याला विचार करणं देखील नकोसं होतंय तिथे एक हा कोब्रा शेतात झोपलेल्या एका महिलेच्या अंगावर जाऊन बसला आहे. भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक महिला झाडाखाली झोपली आहे. त्यावेळी तिच्या पाठीवर एक किंग कोब्रा येऊन बसला आहे. हे दृष्य पाहातानाच अंगावर काटा उभा राहात आहे, मग विचार करा त्या महिलेचं काय झालं असेल? हे वाचा : गांभिर्य दाखवण्यासाठी पाकिस्तानी रिपोर्टर उतरला नाल्यात आणि… घटनेचा Video Viral ही धक्कादायक क्लिप शेअर करताना IFS नंदा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा असं घडतं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल?’ फुटेजमध्ये साप महिलेच्या वर बसून हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. पुढे त्यांनी लिहिले की, ‘‘या महिलेला काहीही झालेलं नाही, हा साप काहीवेळाने तेथून निघून गेला आहे.’’
हे वाचा : ‘तो’ एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर नेटकरी फारच घाबरले आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. या व्हिडीओला 47 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर हजाराहून अधिक लोकांनी याला लाईक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केलं आहे. लोकांनी स्वत:ला त्या महिलेच्या जागी ठेवून सांगितलं की, त्यांनी अशा वेळी काय केलं असतं. यावर एका युजरने लिहिलं की, ‘‘मी देखील या महिलेप्रमाणे झोपून राहिलो असतो, तिने योग्य निर्णय घेतला’’. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘‘देवावर विश्वास ठेवा, तुमचं कोणी वाकडं करु शकत नाही.’’