काही दिवसांपूर्वी एका गावामधील तरुण-तरुणींचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक तरुणी बाईकच्या समोरच्या बाजूला रायडरच्या दिशेने तोंड करून बसली होती. या कृत्यानंतर गावकऱ्यांनी या गाडीचा पाठलाग करीत त्यांना खडे बोल सुनावले होते. इतर नागरिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ भोपाळचा (Bhopal) असल्याचं सांगितलं जात आहे. (Criticism erupts on a viral video on social media of a young man riding a bike with a girl ) भोपाळच्या रस्त्यावर एक तरुण स्टाईलने बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणाच्या समोर एक तरुणी त्याला घट्ट मिठी मारून बसली आहे. अनेकांनी हे अश्लिल असल्याचं मानून यावर टीका केली. भोपाळच्या रस्त्यावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तरुणी समोरच्या बाईकवर स्वार होताना कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओच्या आधारे भोपाळ पोलीस त्या तरुणीवर वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करू शकतात. मात्र न्यूज 18 व्हायरल व्हिडिओची पुष्टी करीत नाही.