क्राईम
नवी दिल्ली, 28 जानेवारी : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे देशातील एक प्रसिद्ध शहर आहे. आपल्या विविधरंगी सणांसाठी आणि समृद्ध खाद्य संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलकाता शहरामध्ये गुन्हेगारी घटनादेखील मोठ्या प्रमाणात घडतात. आठ वर्षांपूर्वी शहरातील एका खुनाच्या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही घटना इतकी गुंतागुंतीची होती की तपास करणारे पोलीसही काहीकाळ गोंधळले होते. शहरातील रॉबिन्सन लेन या पॉश एरियामध्ये ही घटना घडली होती. या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचा आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील रॉबिन्सन लेन या पॉश एरियामध्ये 77 वर्षांचे अरबिंदो डे आपला मुलगा पार्थ आणि मुलगी देबजानीसोबत राहत होते. अरबिंदोंच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. मुलगा पार्थ अभ्यासात अतिशय हुशार होता. काही वर्षांपूर्वीपर्यंत तो एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला होता. मुलगी देबजानी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. त्यांच्या कुटुंबात दोन पाळीव कुत्रीही होती. देबजानीचा त्यांच्यावर फार जीव होता. हेही वाचा - शिवन्याच्या जन्माची कहाणी, जन्मताच होतं दुधाच्या पिशवी पेक्षाही कमी वजन! 11 जून 2015 रोजी, रॉबिन्सन लेनमधील एका फ्लॅटमधून धूर निघत असल्याची माहिती कुणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. मिळालेल्या माहितीच्याआधारे काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. ज्या घरातून धूर निघत होता ते घर अरबिंदो डे यांचं होतं. पोलीस फ्लॅटमध्ये शिरले तेव्हा त्यांना उग्र वास जाणवला. वासाच्या दिशेनं गेलं असता, अरबिंदोंच्या खोलीतील बाथरूममध्ये एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळला. ती व्यक्ती 77 वर्षांचे अरबिंदोच होते. अरबिंदो यांनी स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. मात्र, घरात उपस्थित असलेला त्यांचा मुलगा पार्थ याला याबाबत काहीही सांगता आलं नाही. तो स्वतःही आश्चर्यचकित आणि अस्वस्थ दिसत होता. बाथरूममधील जळालेला मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवताना फ्लॅटमधील दुसऱ्या खोलीत आणखी एक सांगाडा पोलिसांना आढळला. हा सांगडा अरबिंदो यांची मुलगी आणि पार्थची 50 वर्षांची बहीण देबजानी हिचा होता. साधारण सात ते आठ महिन्यांपूर्वीच देबजानीचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती फॉरेन्सिक तपासात समोर आली. घराची झडती घेतली असता पोलिसांना हाडांनी भरलेल्या दोन पिशव्या आढळल्या. ही हाडं कुठल्यातरी प्राण्याची असल्यासारखी वाटत होती. पोलिसांनी ती हाडं फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली. हेही वाचा - चुकीच्या व्यक्तीसोबत घेतला पंगा; मुलाने चोरांनाच पळवून पळवून मारलं, Video तुफान व्हायरल मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवल्यानंतर आणि पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी पार्थ डे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पार्थनं पोलिसांना सांगितलं की, सुमारे सहा वर्षांपूर्वी तो एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचा. मात्र, आईच्या निधनानंतर पार्थनं कंपनी सोडली आणि घरीच राहत होता. पार्थनं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, त्याची बहीण देबजानीला पाळीव कुत्र्यांची खूप आवड होती. पण, एक-एक करून ती दोन्हीही कुत्री मेली. यामुळे देबजानीला मोठा धक्का बसला आणि तिनं खाणं-पिणं बंद केलं. तिची प्रकृती ढासळू लागली. तिला उपचारही घ्यायचे नव्हते. परिणाणी, डिसेंबर 2014 मध्ये देबजानीनं जगाचा निरोप घेतला. बहिणीच्या आत्म्याला जेवण देत होता पार्थ अधिक चौकशीत पोलिसांना समजलं की पार्थचं बहीण देबजानीवर खूप प्रेम होतं. यामुळेच त्यानं बहिणीच्या मृत्यूनंतरही तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. ती जिवंत असल्याप्रमाणे तो तिचा मृतदेह बेडवर ठेवायचा. ज्या बेडवर देबजानीचा सांगाडा सापडला, त्याच ठिकाणी पोलिसांना काही अन्नपदार्थही सापडले होते. याबाबत पोलिसांनी पार्थला विचारलं असता त्यानं सांगितलं होतं की, तो आपल्या बहिणीच्या आत्म्यासाठी जेवण ठेवत असे. पार्थच्या डायरीत आढळल्या महत्त्वाच्या नोंदी या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी पार्थ डेला डॉक्टरांकडे पाठवून त्याची तपासणी करून घेतली. मानसिकदृष्ट्या पार्थ ठीक असल्याचं तपासणीत आढळलं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, त्यावेळी पोलिसांनी पार्थ डेच्या खोलीतून अनेक डायरी जप्त केल्या होत्या. पार्थनं त्याच्या आयुष्याशी निगडीत बाबी या डायरींमध्ये लिहिल्या होत्या. ‘त्याची आई त्याला नपुंसक मानत होती. या कारणावरून त्याला आईचा राग यायचा’, अशी नोंदही पोलिसांनी आढळली होती. पोलिसांना सापडलेल्या डायरीत एका ठिकाणी पार्थनं लिहिलं होतं की, तो बहीण देबजानीसोबत शहराबाहेर फिरायला गेला होता. त्या प्रवासात त्याच्या बहिणीनं त्याच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. असे अनेक दुःखद अनुभव आणि घटना पार्थनं डायरीत लिहिल्या होत्या.
पोलिसांनी केला होता सखोल तपास या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पार्थचे वडील आणि बहिणीच्या मृत्यूचा स्वतंत्रपणे तपास केला होता. या तपासादरम्यान, अरबिंदो यांचा एक भाऊ अरुण याचंही नाव समोर आलं होतं. अरबिंदो आणि अरुण यांच्यात मालमत्तेचा वाद होता. मात्र, अनेक दिवसांच्या तपासानंतर अरुणला या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केलं होतं. मात्र, आरोपी म्हणून त्यांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. हे प्रकरण अनेक दिवस चर्चेत होतं.