JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'तो' सध्या काय करतोय? IPL 2021 नंतर पहिल्यांदाच समोर आला माहीचा VIDEO

'तो' सध्या काय करतोय? IPL 2021 नंतर पहिल्यांदाच समोर आला माहीचा VIDEO

आयपीएल 2021 स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) रांचीमध्ये घरी परतला आहे. धोनीचे फॅन्स नेहमीच त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 20 मे: आयपीएल 2021 स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन  महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) रांचीमध्ये घरी परतला आहे. धोनीचे फॅन्स नेहमीच त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतात. स्वत: धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. साक्षी नेहमी धोनीचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. साक्षीने आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतरचा धोनीता पहिला व्हिडीओ (VIDEO) शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी बहुतेक वेळ हा रांचीमधील फार्म हाऊसमध्ये असतो. धोनी फार्म हाऊसमध्ये शेती करत असून त्याच्या शेतीमधील उत्पादने बाजारपेठेत विकली जातात. धोनीचा नवा व्हिडीओ देखील रांचीमधील फार्म हाऊसमधील आहे. या व्हिडीओमध्ये धोनी फार्म हाऊसमधील कुत्र्यांसोबत (Dog) खेळत आहे. धोनीसोबत त्याची मुलगी जीवा देखील आहे. महेंद्रसिंह धोनीला विदेशी कुत्रे पाळण्याची हौस आहे. त्याच्या घरात विदेशी वंशाचे अनेक कुत्रे आहेत. धोनीकडील सॅम या बेल्जियम वंशाच्या कुत्र्याची किंमत भारतीय बाजारपेठेत 75 हजार रुपये आहे. लिली आणि गब्बर या कुत्र्यांची किंमत 60 ते 80 हजार आहे. त्याचबरोबर माहीकडं एक डच वंशाचा शेपर्ड कुत्रा असून त्याचं नाव झोया आहे.

संबंधित बातम्या

क्रिकेट फॅन्सच्या मागणीनंतर डेव्हिड वॉर्नर परतला, शेअर केला भन्नाट VIDEO आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेची कामगिरी चांगली झाली आहे. चेन्नईनं सात पैकी 5 सामने जिंकले असून ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या सिझनमध्ये चेन्नईनं निराशाजनक कामगिरी केली होती. त्यांना पहिल्यांदाच ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यास अपयश आले होते. हे अपयश झटकत चेन्नईनं या आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या