मुंबई, 01 ऑगस्ट : चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये अथवा टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटाझेशन आणि मास्क वापरणं याबाबत सातत्यानं सतर्क केलं जात आहे. मार्च ते मे तब्बल तीन महिने लॉकडाऊनही देशभरात लागू करण्यात आला होता. कोरोनामुळे अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एका डॉक्टरनं रुग्णांचे हाल होऊ नयेत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालनही व्हावं या हेतूनं एक भन्नाट जुगाड केला आहे. दवाखाने बंद असल्यानं पडसं, खोकला आणि व्हायरल ताप किंवा इतर दुखण्याचे आजार असणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या डॉक्टरनं चक्क सोशल डिस्टन्स राखून टेथस्कोपनं रुग्णाला स्वत:चं तपासण्यासाठी सांगितलं. रुग्णाला त्याची समस्या विचारली. आणि त्यावर योग्य ते उपचारही केले.
हे वाचा- चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO भारतात प्रत्येक समस्येवर जुगाड करून उत्तर काढलं जातं. काही दिवसांपूर्वी फेस मास्क शील्डचा जुगाड व्हायरल झाल्यानंतर आता हा डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की डॉक्टरनं टेथस्कोपची एक बाजू आपल्या कानाला लावली आणि सोशल डिस्टन्स राखून दुसरी बाजू रुग्णाच्या हातात दिली आणि त्याला स्वत: तपासण्यासाठी सांगितलं. काही सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आणि त्याला औषधं दिली. कोरोना काळात अशा पद्धतीनं काळजी घेऊन डॉक्टरनं रुग्णांना तपासलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.