ब्लेक मॉरिस (Blake Morris) आणि मॅगी मॉर्टन (Maggie Morton) या जोडप्याने एक जुने आणि रिटायर्ड हेलिकॉप्टर ऑनलाइन पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की थोडे प्रयत्न आणि पैसा मोजल्यानंतर ते एका आलिशान कॅम्प हाउसमध्ये बदलू शकते. यूएस कोस्ट गार्डमध्ये हेलिकॉप्टर पायलट राहिलेल्या या जोडप्याला विमानाचे चांगले ज्ञान होते आणि त्यांनी या अनोख्या प्रकल्पात आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर केला.
यूएसमधील पायलट जोडप्याने फेसबुक मार्केटप्लेसवर हे जुनं कालबाह्य झालेलं हेलिकॉप्टर पाहिलं होतं आणि ते त्यांना कौटुंबिक सुट्टीसाठी योग्य वाटलं. हे हेलिकॉप्टर पाहिल्यानंतर पायलट जोडप्याला त्यात कसे बदल करता येतील हे लगेच समजले. अशा परिस्थितीत वेळ न दवडता त्यांनी हा करार फायनल केला.
मॉरिसच्या म्हणण्यानुसार, हे हेलिकॉप्टर पूर्वी जर्मन पोलिसांकडे होते आणि तेथून ते काही वर्षे अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याकडे राहिले आणि 2011 मध्ये अमेरिकेत परतले. हेलिकॉप्टर ताब्यात घेतल्यानंतर, मॉरिसने कॅम्परमध्ये रूपांतरित करण्यासाठी संपूर्ण ब्लूप्रिंट तयार केली.
UPI नुसार, मॉरिसची पार्टनर मॅगीलाही ही गोष्ट आवडली आणि तिने मॉरिसला पूर्ण मदत केली. या जोडप्याने त्यांच्या हेलिकॉप्टरचे हेलीकँपर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड केली आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत राहिले. भंगार झालेले हेलीकॉप्टर राहण्यायोग्य बनवण्याची प्रक्रिया सोपी नव्हती.
आता तयार झालेले हेलिकॅम्पर कॅम्पच्या मुक्कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. आउटडोअर स्पीकर, आउटडोअर टीव्ही हुक अप, केबल हुकअप सर्वकाही उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आहे. त्याच्या आत एक स्वयंपाकघर देखील आहे, जिथे स्वयंपाक करताना टीव्ही पाहता येतो.
अलाबामामध्ये राहणाऱ्या मॉरिस आणि मॅगीने त्यांचे सर्व फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकले आहेत. कॅम्पस्टेमध्ये त्याला तडजोड करावी लागणार नाही म्हणून त्याने छोट्या छोट्या तपशीलावर खूप मेहनत घेतली. टॉयलेट, बेडरूम, बाथरुमपासून ते कॅम्पिंगसाठी तुम्हाला जे काही लागेल ते या हेलीकँपरमध्ये आहे.
व्हॅन, बस आणि ट्रकमध्ये अशा प्रकारे कॅम्पर बनवण्याच्या अनेक कथा आपण आतापर्यंत ऐकल्या आणि पाहिल्या आहेत, परंतु हेलिकॉप्टरचे कॅम्परमध्ये रूपांतर पहिल्यांदाच होताना पाहणे काही वेगळेच आहे. मॉरिस आणि मॅगी त्यांच्या नवीन प्रयोगाबद्दल खूप आनंदी आहेत कारण त्यांना लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@helicamper_rv)