लंडन, 26 मार्च : कोरोना व्हायरसचं संकट जगावर ओढावलं आहे. या संकटाला मात देण्यासाठी सर्वच देशांनी कंबर कसली आहे. काही देशांमध्ये लॉकडाउनची स्थिती आहे. भारतातही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळं अनेक लोक घरातच अडकले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनीसुद्धा याला सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. या कठीण काळातले काही भावूक क्षणही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका लहान मुलीचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या 18 सेकंदाच्या व्हिडिओत मुलगी घराच्या बाहेर आली आहे. त्याचवेळी आजुबाजुच्या घरांमधून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात होते. एका सुरात शेजारच्या घरातले लोक तिला शुभेच्छा देतात. यावेळी शुभेच्छांमुळे भारावलेली चिमुकली रडताना दिसते. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
ट्विटरवर एका युजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लिहिलं आहे की, ब्रिटनमध्ये आज 8 वर्षांची सोफी खूपच नाराज होती. कारण कोरोनामुळे तिचा वाढदिवस साजरा करता येणार नव्हता. त्यातच ती घरातून बाहेर पडली तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिला एकाच वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भावूक झालेली सोफी रडताना दिसते. हे वाचा : लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं कोरोनाचा फटका चीननंतर इटली, इराण या देशांना बसला आहे. युरोपात सर्वाधिक धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात अमेरिकाही सापडली आहे. चीन, इराण, इटलीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत वेगानं होत आहे. त्या तुलनेत भारतात लवकर खबरदारी घेतली गेल्यानं कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी आहे. हे वाचा : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू? काय आहे फोटोमागची कथा