JOIN US
मराठी बातम्या / Viral / झेंडा लावला म्हणून पेटला वाद, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज, VIDEO व्हायरल

झेंडा लावला म्हणून पेटला वाद, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज, VIDEO व्हायरल

या गावात निळा झेंडा लावल्यावरून वाद पेटला होता. त्यानंतर जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 08 सप्टेंबर : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे. कन्नड तालुक्यातील नेवपूर गावात ही घटना घडली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  या गावात निळा झेंडा लावल्यावरून वाद पेटला होता. त्यानंतर जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी  पोलीस आणि कार्यकर्त्यांत धुमश्चक्री उडाली होती.

त्यानंतर  पोलिसांनी कार्यकर्त्यांवर तुफान लाठीचार्ज केला. जो सापडेल्या त्याला पोलिसांनी बळाचा वापर करून मारहाण केली.  पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पोलीस हे पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत आहे. काही कार्यकर्ते हे गयावया करत आहे परंतु, तरीही पोलिसांचा लाठीचार्ज सुरूच होता. तर दुसरीकडे, कार्यकर्त्यांनीच पोलिसांवर हल्ला केला होता. त्यामुळे लाठीचार्ज करावा लागला असा दावा पोलिसांनी केला आहे. तर  निळा झेंडा लावल्याच्या रागातून पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केली. अनेक जण जखमी झाले आहे, असा प्रतिआरोप  कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला आहे. या घटनेमुळे सध्या नेवपूर गावात तणावपूर्ण शांतता आहे. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना औरंगाबाद शहरातील शासकीय  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या