पुणे, 25 डिसेंबर : नाताळ किंवा ख्रिसमस या सणाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. लहानग्यांपासून ते थोरल्या मोठ्यांपर्यंत या सणांचा उत्साह असतो. यात सर्वांच्या नजरा असतात त्या सांताकडे. ‘जिंगल बेल्स’ (Jingle Bells) या गाण्यात नाताळच्या दिवसात एक वेगळीच मजा असते. पण तुम्ही कधी ढोल ताशांवर जिंगल्स बेल ऐकले आहे? जिंगल्स बेल या गाण्याची प्रसिद्ध लक्षात घेता या गाण्याचे हिंदी आणि मराठी व्हर्जन देखील आले आहे. मात्र पुणे तिथे काय उणे त्यांनी एक वेगळाच पॅटर्न आणला. चक्क या गाण्याचा पुणेरी अवतार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चक्क नऊवारी नेसलेल्या एका चिमुकलीने Saxophone या वाद्यावर वाजवले आहे. त्यामुळे जिंगल बेल्स या गाण्याची धुन काही तरी वेगळीच आणि भन्नाट येत आहे. वाचा- छोटा ब्रुस ली, 1 मिनिटात फोडल्या 125 टाईल्स! पाहा हा VIDEO जिंगल बेल्स या गाण्याचे आतापर्यंत अनेक विदेशी भाषेत व्हर्जन आले. मात्र सध्या या सर्व व्हर्जनला एक तोडीस तोड व्हर्जन एका चिमुकली ने Saxophone या वाद्यातून सादर केला आहे. पाहा व्हिडिओ. वाचा- सूर्यग्रहणाचा थेट क्रिकेट सामन्यावर परिणाम, BCCI करणार वेळापत्रकात बदल?
वाचा- मुंबईत थर्टी फर्स्टला रेव्ह आणि ड्रग्स पार्ट्या करताय, तर सावधान! हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून या तो प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय लोक या व्हिडिओला आणि त्या मुलीच्या या कलेचेही कौतुक करत आहेत.