हैदराबाद, 28 ऑगस्ट : रस्त्यांवर अनेकवेळा जाताना बोर्ड पाहायला मिळतात नजर हटी दुर्घटना घटी, आपल्या स्पीडवर नियंत्रण ठेवा असे बोर्ड असून वारंवार सांगूनही अनेकवेळा वाटेल तशा गाड्या चालवण्याचे अनेक प्रकार वारंवार समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच एका भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हैदराबाद इथल्या मेलारदेवपल्ली भागातील दुर्गानगर परिसरात रस्त्यावर वळण घेण्याच्या नादात भरधाव दुचाकी डिव्हायडरवर आदळून भीषण अपघात झाला. ही घटना 26 ऑगस्टरोजी रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा अपघात खूप भीषण होता ती दुचाकीची डिव्हायडरला धडक झाल्यानंतर दोन तरूण दोन फूट दूर आदळले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
हे वाचा- पेन्शनसाठी 60 वर्षाच्या मजूर मुलानं आईला पाठीवरून नेलं बँकेत आणि… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुचाकी खूप वेगात होती. ओव्हरस्पीड असल्यानं गाडी वळवण्याचा अंदाज थोडा चुकल्यानं दुचाकी लाईटच्या पोलवर आदळली आणि दोघंही बाईकस्वार हवेत उडून दोन फूट दूर आदळले. दुचाकीचा स्पीड खूप जास्त असल्यानं हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिकांनी या दुर्घटनेनंतर रुग्णालयात या दोघांनाही दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.