विजयवाडा, 04 सप्टेंबर : आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा परिसरातील एका गावात भीषण स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट गुरुवारी झाला. काम सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटानं प्लायवूड कंपनीत एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सुरमपल्ली गावात एका प्लायवूड तयार करणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला. हा स्फोटाची भीषणता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षणात स्फोट झाल्यानं होत्याचं नव्हतं झालं. प्लायवूड कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या स्फोटामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ आणि धूर झाला होता.
हे वाचा- फुगे बांधून पठ्ठ्यानं रचला वर्ल्ड रेकॉर्ड, 25 हजार फूटांवर जाऊन पोहचला अन्… या स्फोटात होरपळून एकाच कुटुंबातील वडील-मुलाचा मृत्यू झाला आहे. कंपनीत ठेवण्यात आलेल्या रेक्झिन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की काम सुरू असताना अचानक काही कळायच्या आता स्फोटाचा आवाज येतो आणि आगीच भडका उडतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.