JOIN US
मराठी बातम्या / Viral / भरधाव येणारा ट्रक पाण्यासोबत गेला वाहून, पाहा LIVE VIDEO

भरधाव येणारा ट्रक पाण्यासोबत गेला वाहून, पाहा LIVE VIDEO

सीमेंटनं भरलेला ट्रक वेगान येत असताना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढला आणि ट्रक पाण्यासोबत वाहून गेला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बांसवाडा, 23 ऑगस्ट : उत्तर भारतात मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. अनेक ठिकाणी महापूर आला असून बेघर होण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. रस्त्यावरून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या पाण्यात सीमेंटनं भरलेला ट्रक पाण्यात वाहून गेला आहे. सीमेंटनं भरलेला ट्रक वेगान येत असताना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढला आणि ट्रक पाण्यासोबत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्रक चालकाला मोठ्या मुश्किलीनं वाचवण्यात आलं आहे. ही घटना राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात कुशलगड इथली घटना आहे. पोलिसांनी या ट्रक चालकाचा जीव वाचवला आहे.

हे वाचा- एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो… दुसरीकडे रतलाममध्ये एक व्हॅन मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्यानं वाहून गेली आहे. या गाडीतील 3 जणांना दोरीने वाचवण्यात यश आलं आहे. या दोन्ही व्हिडीओमध्ये जीप आणि सीमेंटनं भरलेला ट्रक दोन्ही वाहून गेले आहेत मात्र पोलिसांनी दोन्ही ठिकाणी चालकांना वाचवण्यात यश आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या