JOIN US
मराठी बातम्या / Viral / ते आले आणि जीव मुठीत धरून पळाले; 20 सेकंदात चोरांसोबत असं काही घडलं की... ; पाहा VIDEO

ते आले आणि जीव मुठीत धरून पळाले; 20 सेकंदात चोरांसोबत असं काही घडलं की... ; पाहा VIDEO

चोरीच्या नादात चोरांसोबत जे घडलं यानंतर चोर पुन्हा चोरी करण्याची हिंमत करणार नाहीत.

जाहिरात

कारचालकाने बाईकस्वार चोरांना घडवली अद्दल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 सप्टेंबर : रस्त्यावर शस्त्राचा धाक दाखवून पादचाऱ्यांना लुटणारे चोर, फक्त फिल्ममध्येच नव्हे तर प्रत्यक्षातही अशा काही घटना घडतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते किंवा आपण विचारही केलेला नसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिवसाढवळ्या दोन व्यक्तींनी रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणतरुणीला लुटण्याचा प्रयत्न केला. पण फक्त 20 सेकंदात चोरांसोबत असं काही घडलं की जसे ते आले तसे ते जीव मुठीत धरून पळाले. बाईकवरून येत दोन चोरांनी दिवसाढवळ्या रस्त्यावर तरुणतरुणीला लुटण्याचा प्रयत्न केला. पण आपल्यासोबत पुढे काय घडणार आहे, याचा विचारही या चोरांनी केला नव्हता. चोरीच्या नादात चोरांसोबत जे घडलं त्यामुळे कदाचित त्यांना आयुष्यभराचा धडा मिळाला असेल. यानंतर हे चोर पुन्हा चोरी करण्याची हिंमत करणार नाहीत. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला फुटपाथवरून एक तरुण आणि एक तरुणी एकत्र चालताना दिसतात. इतक्यात बाईकवरून दोन व्यक्ती येतात. हे दोघंही चोर आहेत. ते या तरुणतरूणीला शस्त्राचा धाक दाखवतात आणि त्यांना हात वर करायला लावतात. त्यानंतर ते त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. हे वाचा -  शक्ती नाही युक्तीचा केला वापर! कारचालकाने सशस्त्र दरोडेखोरांना क्षणात पळवून लावलं; पाहा VIDEO इतक्यात तिथूनच एक कार जात असते. कारचालक रस्त्यावरील चोरीचं हे दृश्य पाहतो. तसा तो आपल्या गाडीचा वेग वाढवतो. कारचालकाला पाहताच आता आपल्यासोबत काहीतरी भयंकर होणार आहे, याची कल्पना या चोरांना येते. त्यामुळे ते बाईकवरून पळण्याच्या तयारीत असतात तोच कारचालक आपली गाडी त्या बाईकच्या दिशेने वेगाने नेतो आणि बाईकला जोरदार टक्कर देऊन तिथून निघून जातो.

संबंधित बातम्या

बाईकस्वार चोर बाईकसह धाडकन कोसळतात. दोघांनाही दुखापत होते, एक चोर तर लंगडताना दिसतो. दोघंही कसेबसे उठतात आणि पुन्हा बाईकवर बसून पळ काढतात. दुसरीकडे ज्या तरुणतरुणीला हे चोर लुटण्याचा प्रयत्न करत होते. तेसुद्धा ज्या दिशेने आले त्या दिशेने चोरांपासून दूर पळून जातात. हे वाचा -  VIDEO : महामार्गावर वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद @semladroes ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण जबरदस्त आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या