JOIN US
मराठी बातम्या / Viral / Optical Illusion : खडकाळ भागात लपलीय मेंढी, तिला 11 सेकंदांत शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार?

Optical Illusion : खडकाळ भागात लपलीय मेंढी, तिला 11 सेकंदांत शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार?

ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम निर्माण करणारा हा फोटो एका खडकाळ भागातला आहे. या फोटोत एक मेंढी लपलेली आहे, तिच तुम्हाला शोधून काढायची आहे.

जाहिरात

व्हायरल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई २५ नोव्हेंबर : कधी कधी एखादा फोटो त्यात दडलेली रहस्यं जगासमोर आणतो. काही फोटोज मेंदूला झिणझिण्या आणू शकतात. काही फोटोग्राफर नियोजनबद्ध पद्धतीने फोटो काढतात. कारण पाहणाऱ्यांच्या मनात भ्रम निर्माण करणं हाच त्यांचा उद्देश असतो. परंतु, काही फोटोज इतक्या नकळतपणे टिपले जातात, की ते पाहून गोंधळातच पडायला होतं. हे फोटो दिसायला अगदी सहज, साधे वाटतात; पण त्यात बरंच काही दडलेलं असतं. सध्या असाच एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोत एक मेंढी लपलेली आहे; पण ती मेंढी नेमकी कुठे उभी आहे का लपलीय हे समजणं अवघड आहे. ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम निर्माण करणारा हा फोटो एका खडकाळ भागातला आहे. या फोटोत एक मेंढी लपलेली आहे. ती लपलेली मेंढी शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे अगदी कमी अवधी आहे. केवळ 11 सेकंदांत ही मेंढी शोधायची आहे. दिलेल्या वेळेच्या आत मेंढी शोधून काढलीत, तर तुमची निरीक्षणशक्ती आणि तल्लख बुद्धी कौतुकास्पद ठरेल. हा फोटो खडकाळ प्रदेशाचा आहे. यात एक मेंढी लपली आहे. ही मेंढी चढत-चढत वरपर्यंत गेली आहे. परंतु, परत मागे फिरणं तिच्यासाठी अडचणीचं बनलं आहे. तसंच आपण खाली पडू याचीही तिला भीती आहे. त्यामुळे ती अशा ठिकाणी थांबली आहे की तिथून तिला कुठे जायचं हेच सुचत नाहीये. यासाठी तुम्ही या मेंढीला मदत करून तिला खाली घेऊन यायचं आहे.

परंतु, ती मेंढी सहजासहजी कुणालाच फोटोत दिसत नाहीये. कारण, ती मेंढी त्या भागात अशा पद्धतीने अडकली आहे, की तिला शोधून काढणं अवघड झालंय. त्यामुळे त्या मेंढीला शोधून काढणं हे आव्हान तुमच्यासमोर आहे. मेंदूला झिणझिण्या आल्या असतील तर फोटो पाहा झूम करून अनेक जण मेंढीला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत असणार. बराच वेळ घालवूनही मेंढी सापडत नसेल, तर हरकत नाही. तुम्ही तो फोटो एकदा झूम करून पाहा. फोटो झूम केल्यावर फोटोचा कानाकोपरा नीट निरखून पाहा. तुम्हाला ती मेंढी नक्कीच दिसेल. तिच्या शरीराचा रंग तिथल्या खडकांशी साधर्म्य असलेला आहे. त्यामुळे, नीट लक्षपूर्वक पाहिलंत तर मधोमध ती मेंढी उभी असलेली तुम्हाला दिसेल.

व्हायरल फोटो

आता तरी तुम्हाला यामध्ये मेंढी दिसली असेल, आता हा फोटो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना याचं उत्तर शोधता येतं का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या