JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरारारा... खतरनाक! बैलाची भारी करामत; Stunt Video पाहून नेटिझन्स हैराण

अरारारा... खतरनाक! बैलाची भारी करामत; Stunt Video पाहून नेटिझन्स हैराण

बैलाने जे केलं ते पाहूनही विश्वास बसणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर : माणसांना तुम्ही स्टंट (Stunt video) करताना पाहिलं असेल पण कधी प्राण्यांना स्टंट (Animal stunt video) करताना पाहिलं आहे का? काही दिवसांपूर्वीच एका शिंगावर टब फिरवणाऱ्या म्हशीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला होता. त्यानंतर आता स्टंट करणाऱ्या बैलाचा व्हिडीओ (Bull video) व्हायरल होतो आहे. बैलाने खतरनाक स्टंट (Bull stunt video) केला आहे. पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. बैलाने असं काही करून दाखवलं आहे, जे कदाचित माणसांनाही शक्य होणार नाही. बैलसुद्धा असं काही करू शकतो, यावर तुम्ही स्वतः व्हिडीओ पाहिला तरी विश्वास बसणारन नाही. आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही, ते या बैलाने करून दाखवलं आहे आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी काही जनावरं बसली आहेत. त्यांच्याभोवती एक भिंत आहे. त्याच भिंतीच्या पलीकडे एका प्राण्याचे दोन पाय दिसतात. हे पाय म्हणजे चक्क बैलाचे आहेत. हे वाचा -  भलामोठा बैल भिंतीच्या पलिकडे आहे. त्याला आत यायचं आहे. म्हणून तो आपल्या पुढील दोन पायांवर उभा राहतो आणि आपले मागचे दोन पाय भिंतीच्या दुसऱ्या दिशेला टाकतो. त्यानंतर तो मागे मागे सरकतो. उडी मारत भिंतीच्या अलिकडे येतो आणि मग पुढील दोन पायही आत घेतो. इतका मोठा बैल ही भिंत अगदी सहजपणे ओलांडून आत येताना दिसतो. जे पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हे वाचा -  ‘hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बैलाचं करतब सर्वांना आवडलं आहे. नेटिझन्सनी यावर बऱ्याच कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या