JOIN US
मराठी बातम्या / Viral / म्हशीनं वाचवले कासवाचे प्राण, लोकांनी आनंदानं केला जल्लोष; पाहा VIDEO

म्हशीनं वाचवले कासवाचे प्राण, लोकांनी आनंदानं केला जल्लोष; पाहा VIDEO

कासवाच्या जिवावर बेतणारं संकट आलं होतं. एका म्हशीने पुढाकार घेतला आणि आपल्या शिंगांचा वापर करून कासवाचे प्राण वाचवले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 डिसेंबर: एका म्हशीनं (Buffalo) कासवाचे (Tortoise) प्राण वाचवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल (Viral Video) मीडियात जोरदार व्हायरल (Social Media) होत आहे. अनेकदा माणसांना प्राण्यांच्या भावना (Emotions of animals) कळत नाहीत. प्राण्यांना नेमका काय त्रास होतोय किंवा ते आपल्याला काय सांगू पाहत आहेत, हे अनेकदा समजत नाही. मात्र एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची भाषा आणि वेदना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसून आलं आहे.

संबंधित बातम्या

म्हशीने वाचवले प्राण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे अधिकारी सुशांत नंदा हे सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. त्यांनी हा व्हिडिओ समोर आणला. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ शूट केलेला नाही, तर त्यांना दिसलेला व्हिडिओ फॉरवर्ड केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र या व्हिडिओत म्हशीने कासवाचे प्राण वाचवल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. शिंगांचा केला वापर कासवाचा सर्व संकटांपासून बचाव करण्यासाठी त्याच्या पाठीवर कडक शेल असते. मात्र जर कासव उलटं झालं, तर त्याच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचं सांगितलं जातं. कासवाचा खालचा भाग हा पाठीइतका टणक नसतो. त्यामुळे त्या भागावर हल्ला झाला तर कासवाला स्वतःचा बचाव करणं कठीण जातं. रस्त्यावर उलटं होऊन पडलेलं कासव या व्हिडिओत दिसतं. तर म्हैस आपल्या शिंगाने त्याला सरळ करताना दिसते. हे वाचा- कुत्रा नसता तर आम्ही लेक गमावली असती, Viral होतेय एका आईची भावनिक पोस्ट लोकांचा उत्साह व्हिडिओत दिसणारी म्हैस तिच्या प्रयत्नात यशस्वी होते का, याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांनी जेव्हा कासव सरळ झालं, तेव्हा जोरदार जल्लोष केला. मुख्य म्हणजे कासवाच्या जिवाला धोका असून त्याला सरळ होण्यासाठी मदत करायला हवी, हे म्हशीला कसं समजलं असावं, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या