म्हैस आणि तिचं रेडकू चर्चेत. (प्रतीकात्मक फोटो)
जयपूर, 19 ऑक्टोबर : प्राण्यांना 4 पाय असतात हे तुम्हाला माहितीच आहे. पण त्यांचे इतर अवयव म्हणजे कान, डोळे हे माणसांसारखेच दोन आणि नाक, तोंड एक असतं. पण कधी प्राण्याला 8 पाय, 4 डोळे, 2 तोंड असल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? सध्या असाच एक विचित्र प्राणी चर्चेत आला आहे. राजस्थानमध्ये एका म्हशीने अशा विचित्र रेडकूला जन्म दिला आहे. राजस्थानच्या दौसा जिल्ह्याच्या सिकरायमधील ही घटना. गीजगढच्या नाथ वाली ढाणीतील एका म्हशीने विचित्र रेडकूला जन्म दिला आहे. या पिल्लाला दोन धड, आठ पाय, दोन तोंड आणि चार डोळे होते.अनोख्या म्हशीच्या जन्माची चर्चा ऐकून त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पशुपालन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. हिराला बैरवा यांनी सांगितलं की, “गाय-म्हशीसारख्या प्राण्यांमध्ये पिल्लांना जन्म देण्यात येणाऱ्या या समस्येला डिस्टोकिया म्हटलं जातं. यात गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर प्राण्यांची प्रसूती करावी लागते. पण ते प्राणी मदतीशिवाय जन्म देण्यास सक्षम नसततात. अशा प्राण्यांबाबत थोडासाही निष्ळाजीपणा झाला किंवा त्यांना नीट हाताळलं गेलं नाही तर भ्रूण किंवा म्हैस यापैकी एक किंवा दोघांचाही मृत्यू होऊ शकतो” हे वाचा - Shocking! हवेत फुटबॉलसारखं उडवून उडवून घेतला जीव; म्हशींनी सिंहाला दिलेल्या भयानक मृत्यूचा VIDEO “पण नाथ वाली ढाणीतील हे डिस्टोकियाचं प्रकरण खूपच गुंतागुंतीचं होतं. डॉक्टरांनी फक्त 10 मिनिटांत म्हशीच्या गर्भातून 2 भ्रूण काढले. हे दोन्ही भ्रूण जिवंत बाहेर काढण्याच यश मिळालं. गीजगढ क्षेत्रातील हे असं पहिलंच प्रकरण असावं”, असं डॉ. बैरवी म्हणाले.
जन्मानंतर हे पिल्लू फार काळ जिवंत नाही राहिलं. 16 ऑक्टोबरला या रेडकूचा जन्म झाला. जवळपास 12 तास जिवंत राहिलं. रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
8 पाय, 4 डोळे, 2 तोंडाचं रेडकू.
याआधी करौलीतील पुरा गावातील म्हशीनेही अशाच विचित्र रेडकूला जन्म दिला. चार डोळे, चार शिंगं आणि दोन तोंडासह या पिल्लाचा जन्म झाला. त्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. हे वाचा - सिंधुदुर्गच्या रस्त्यावर आली मगर, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक थांबताच…; थरकाप उडवणारा VIDEO करौलीतील पशुतज्ज्ञ मुंशीलाल यांनी सांगितलं की, गर्भधारणेवेळी दोन बीज एकत्र जुळल्याने भ्रूणाचा पूर्ण विकास होत नाही. त्यामुळे असे विचित्र प्राणी जन्माला येतात. असे प्राणी जगण्याची शक्यता खूपच कमी असते.