JOIN US
मराठी बातम्या / Viral / FACT CHECK - Budweiser कर्मचारी 12 वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होता?

FACT CHECK - Budweiser कर्मचारी 12 वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होता?

बडवायझरबाबतची (Budweiser) ही बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै : एखादी व्यक्ती दारूच्या बाटलीत लघवी करते, याबाबत कल्पनाही नसणारी दुसरी व्यक्ती ती दारू पिते, विशेष म्हणजे त्या व्यक्तीला या दारूची चवही आवडते आणि ती व्यक्ती आणखी दारू मागून घेते, एका फिल्ममधील हा सीन तुम्हाला नक्कीच लक्षात असेल. मात्र सध्या अशीच एक बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी (social media) पसरते आहे. ती म्हणजे बडवायझरचा (Budweiser) कर्मचारही बिअरच्या (beer) टँकमध्ये लघवी करत असल्याची. मी बडवायझर बिअर (Budweiser beer) पितो, असं तोऱ्यात सांगणाऱ्या मद्यप्रेमींना या एका बातमीमुळे मोठा शॉक बसला. ज्या ब्रँडचा बिअर ते पित आहेत, त्या कंपनीचा कर्मचारी गेली 12 वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होता. ही बातमी सगळीकडे व्हायरल झाली. तुमच्यापर्यंतही ही बातमी एव्हाना पोहोचली असेल. एका वेबसाईटने ही बातमी दिली.  बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण 12 वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, असं मान्य केलं. असं या बातमीचं हेडर होतं. वॉल्टर पॉवेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचाही या बातमीत उल्लेख करण्यात आला होता. ही बातमी वाचल्यानंतर जे लोक ही बिअर पित होते, त्यांना आता पश्चाताप होतो आहे किंवा काही जणांना तर ही बिअर पित असलेल्यांची मजा घेतली आहे.

ही बातमी सोशल मीडियावर पसरत गेली. त्याच्यावर मिम्सही बनू  लागले. मात्र ही बातमी कितपत खरी आहे. इतक्या मोठ्या ब्रँडच्या कंपनीत असं काही होणं शक्य आहे का?

संबंधित बातम्या

जाहिरात

ही बातमी देणारी वेबसाईट आहे,  foolishhumour.com, या वेबसाइटने उपहातात्मक पद्धतीने बातमी दिली. फ्रि प्रेस जर्नल ने दिलेल्या वृत्तानुसार ही वेबसाईट भारतातील फेकिंग न्यूज या वेबसाइटप्रमाणेच आहे. ज्यावर मनोरंजनासाठी फेक न्यूज दिल्या जातात. शिवाय या बातमीत कंपनीची बाजू जाण्यात घेण्यात आलेली नाही. हे वाचा -  भयंकर! मालकीणीला जुळ्या मुली झाल्यानं कुत्र्याला आला राग आणि… आणि सर्वात महत्त्वाचं बातमीचं हेडिंग तर सपर्वांनी पाहिलं मात्र बातमीच्या तळाशी कुणी गेलं नाही. बातमीच्या तळाला ही वेबसाईट फक्त मनोरंजनासाठी आहे. आमची माहिती काल्पनिक असून त्यात सत्यता नाही असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ही बातमी खोटी आहे, यात काहीही तथ्य नसल्याचं दिसून येतं. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या