JOIN US
मराठी बातम्या / Viral / चमत्कार! 'मृत्यूनंतर लगेच आकाशात दिसल्या Queen Elizabeth II', महिलेचा दावा, हा घ्या पुरावा

चमत्कार! 'मृत्यूनंतर लगेच आकाशात दिसल्या Queen Elizabeth II', महिलेचा दावा, हा घ्या पुरावा

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर एका तासाने त्या आकाशात दिसल्याचा दावा महिलेने केला आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्टही केली आहे.

जाहिरात

ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 09 सप्टेंबर : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर फक्त ब्रिटनच नव्हे जर जगभरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. गेल्या काही काळापासून 96 वर्षांच्या क्वीन एलिझाबेथ आजारी होत्या, गुरुवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर काही तासांतच आकाशात त्या आपल्याला दिसल्या असा दावा एका महिलेने केला आहे. महिलेने सोशल मीडियावर याचा फोटो पोस्ट करत पुरावाही दिला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. ब्रिटनच्या स्थानिक वेळेनुसारच क्वीन एलिझाबेथ यांचं निधन दुपारच्या वेळेस झालं. त्यानंतर  इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्सच्या टेलफोर्डमध्ये राहणाऱ्या लीथ बेथेल या महिलेने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार महिलेने पोस्टमध्ये म्हटलं, “ती ड्रायव्हिंग करत घऱी जात होती, तेव्हा तिची मुलगी लेसी अचानक किंचाळली. तेव्हा मीसुद्धा घाबरली. तिने मला आकाशाकडे पाहायला सांगितलं. तेव्हा हे दृश्य मला दिसलं” महिलेने फेसबुक हा  फोटो पोस्ट केला आहे.  हा फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे वाचा -  Episodic mobility मुळे ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू; Queen Elizabeth II यांना झालेला हा आजार काय आहे? फोटोत पाहू शकता अगदी रस्त्याच्या मधोमध समोर ढग दिसत आहेत. या ढगांच्या बाजूला किरणं दिसत आहेत. ढगांचा तुम्ही नीट निरखून पाहिलं तर एक चेहरा दिसतो. डोक्यावर किंचितशी वाकडी हॅट आणि तोंड इतकं दिसतं. ढगांची ही आकृती हुबेहून क्वीन एलिझाबेथ यांच्या चेहऱ्यासारखीच आहे. या आकृतीच्या बाजूने प्रकाश दिसतो आहे. आसपास इतर कोणतेच ढग नाही आहेत. पाहताच क्षणी क्वीन एलिझाबेथ ढगांच्या रूपाने आल्यासारखंच वाटतं.

आपण ढगांची ही आकृती एलिझाबेथ यांच्या मृत्यूच्या एक तासानंतर आकाशात पाहिल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमत हा दावा कितपत खरा आहे याची हमी देत नाही किंवा याचं समर्थनही करत नाही. हे वाचा -  राणी एलिझाबेथच्या बकिंघम पॅलेस बाहेर कपलनं केली अशी गोष्ट, Video Viral होताच कपल होऊ लागले ट्रोल क्वीन एलिझाबेथ स्कॉटलँडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये होत्या. त्यांना एपिसोडिक मोबिलिटीचा त्रास होता. ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री 11.15 वाजता त्यांचं निधन झालं. तेव्हा ब्रिटनमध्ये दुपार होती.  आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. त्यांनी 70 वर्षे ब्रिटिश सिंहासन सांभाळलं. आता त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स नवे राजा बनले आहेत. त्यांना किंग चार्ल्स 3 म्हणून ओळखलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या