JOIN US
मराठी बातम्या / Viral / Wedding Video: गुरुजी बोलावत राहिले...नवरदेव वाट पाहत राहिला; नवरी मात्र भर मंडपात निवांत

Wedding Video: गुरुजी बोलावत राहिले...नवरदेव वाट पाहत राहिला; नवरी मात्र भर मंडपात निवांत

नवरीचं लग्न मंडपातील रूप पाहून नवरदेवाला धक्का बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Bride Sleep At Her Wedding: लग्न (Marriage) हे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण असतो. नवरा-नवरी आपल्या लग्नासाठी महिन्यांपासून तयारी करीत असतात. जी तयारी अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत चालते. वधू आणि वर आपले लग्न खास करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. विशेषत: वधू तिच्या लग्नाच्या दिवशी काय काय प्लान तयार करते. लग्नाच्या मंडपातील प्रवेशापासून ते नृत्य आणि पेहरावापर्यंत सर्व काही वधूने आधीच ठरवलेलं असतं. लग्नाच्या दिवशीच झोपली नवरी.. इतकी प्लानिंग करून जर कोणती नवरी आपल्या लग्नाच्या दिवशी झोपली तर सर्व तयारी धुळीला मिळाली. या दिवसात सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी आपल्या लग्नाच्या दिवशी गाठ झोपताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नवरी झोपली आहे आणि गुरुजी तिला बोलावत आहेत. आणि दुसरीकडे नवरदेव आपल्या नवरीची प्रतिक्षा करीत आहे. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

संबंधित बातम्या

नवरी स्वतःच्या लग्नात झोपल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक व्हिडीओ पाहताना आनंदही घेत आहेत. या व्हिडिओची इंटरनेटवर चर्चा होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मिरवणूक बँक्वेट हॉलमध्ये पोहोचली असून मंडपात वर आपल्या वधूची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे नवरी सर्व काही विसरून झोपण्याचा आनंद घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या