JOIN US
मराठी बातम्या / Viral / एअरपोर्टवर BF ने केलं ब्रेकअप, तरुणीने विमान हलवून टाकलं; शेवटी एअरलाइन्सने...

एअरपोर्टवर BF ने केलं ब्रेकअप, तरुणीने विमान हलवून टाकलं; शेवटी एअरलाइन्सने...

ब्रेकअपनंतर तरुणीने घातलेला गोंधळ पाहून एअरलाइन्सनेही लगेच एक पाऊल उचललं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंगापूर, 29 एप्रिल : लव्ह स्टोरीत ब्रेकअप हा अनेकांसाठी कठीण असा काळ असतो. ब्रेकअपनंतर कोण काय करेल, कोणतं पाऊल उचलेल सांगू शकत नाही. सिंगापूरमधील महिलाही या कठीण परिस्थितीला सामोरं गेली. प्रवासाला निघाल्यावर तिला सोडायला आलेल्या बॉयफ्रेंडने एअरपोर्टवरच तिच्यासोबत ब्रेकअप केलं. तशाच परिस्थितीत ती विमानात बसली पण तिने विमान हलवून टाकलं. ब्रेकअपनंतर तरुणीने घातला गोंधळ पाहून एअरलाइन्सनेही लगेच एक पाऊल उचललं. सिंगापूरची 22 वर्षांची मीसा तन सिंगापूरहून न्यूयॉर्कसाठी निघाली होती. तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत एअरपोर्टवर आला होता. फ्लाइट टेक ऑफ करण्यापूर्वी त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केलं. त्यानंतर मीसा पूर्णपणे तुटली. तरी ती विमानात बसली आणि जसं विमानानं उड्डाण घेतलं तसं तिच्या अश्रूंचा बांध फुटला. लहान मूल रडावं तशी ती मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागली. त्यावेळी फ्लाइटमधील का प्रवाशाने तिचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हे वाचा -  लग्न होताच नवरदेवाला ‘जोर का झटका’, भरमंडपात ढसाढसा रडू लागला; VIDEO VIRAL तिच्या रडण्याने संपूर्ण विमान हादरलं. तिला असं रडताना पाहून सिंगापूर एअरलाइन्सची एअरहॉस्टेस तिचं सांत्वन करायला आली. मीसाने तिला घट्ट मिठी मारली आणि खूप रडली. त्यानंतर मात्र तिने आपलं रडणं थांबवलं. हुंदके देत देत ती शांत झाली. मीसाचा मूड ठिक करण्यासाठी एअरलाइन्सने तिला काही फ्री गिफ्ट्सही दिले. तिला फ्री शॅम्पेन सर्व्ह केली. टेडी बिअर दिला. न्यूयॉर्कला पोहोचताच मीसानेही आपला हा व्हिडीओ शेअर केला आणि सिंगापूर एअरलाइन्सचे तिने आभार मानले. मीसाच्या मते, ब्रेकअपनंतर लगेच प्रवास करणं अशक्य होतं. जर एअरहॉस्टेसने तिचं सांत्वन केलं नसतं तर या वेदना सहन करणं तिच्यासाठी शक्य नव्हतं.  तिने आपल्या एक्सला त्याच्या पुढील आयुष्यासाठी ऑल द बेस्ट म्हटलं आहे आणि आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा -  आजोबांचा खतरनाक BIKE STUNT VIDEO पाहून पोलीसही हादरले; केली कठोर कारवाई मीसाला अनेकांनी तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिला पाठिंबा देणाऱ्या एअरलाइन्सचंही कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या