JOIN US
मराठी बातम्या / Viral / चुकून जेवणाचा डबा सांडला अन् शाळकरी मुलानं केली मेट्रोची सफाई

चुकून जेवणाचा डबा सांडला अन् शाळकरी मुलानं केली मेट्रोची सफाई

एका शाळकरी मुलाने स्वत:कडून झालेली अस्वच्छता स्वत:च निस्तरण्यासाठी केलेल्या स्वच्छतेमुळे मेट्रोच्या स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. या शाळकरी मुलाचा फोटो असलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

व्हायरल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. याशिवाय, आता दिल्ली, हैदराबाद यांसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमधल्या अंतर्गत वाहतुकीसाठी मेट्रोचा वापर केला जातो. राजधानी दिल्लीमध्ये तर मेट्रोचं विस्तीर्ण जाळं आहे. दिवसभरात लाखो नोकरदार आणि विद्यार्थी प्रवासासाठी या मेट्रोचा वापर करतात. प्रवासादरम्यान प्रवासी मेट्रोतील स्वच्छतेची काळजी क्वचितच घेतात. मेट्रोच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच सर्व स्वच्छता करावी लागते. एका शाळकरी मुलाने स्वत:कडून झालेली अस्वच्छता स्वत:च निस्तरण्यासाठी केलेल्या स्वच्छतेमुळे मेट्रोच्या स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. या शाळकरी मुलाचा फोटो असलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रो स्वच्छ करणाऱ्या एका मुलाबद्दलची पोस्ट लिंक्डइनवर व्हायरल झाली आहे. व्हायरल होत असलेली पोस्ट लिंक्डइनवर आशू सिंग नावाच्या युझरने शेअर केली आहे. त्यात एका शाळकरी मुलाचे दोन फोटो आहेत. एक शाळकरी मुलगा कानात इअरफोन्स घालून गाणी ऐकत प्रवास करत होता. शाळेच्या दप्तरातून पाण्याची बाटली काढत असताना त्याचा टिफिन बॉक्स खाली पडला आणि त्यातलं जेवण मेट्रोत सांडलं. त्यानंतर त्या मुलाने सांडलेलं जेवण साफ करण्यासाठी त्याच्या वहीचं एक पान फाडलं. त्यात जेवण भरून घेतलं आणि नंतर रूमालानं साफसफाई केली. हेही वाचा - प्रसिद्धीसाठी तरुणीकडून हद्दच पार, थेट राज्यपालांच्या खुर्चीजवळ गेली आणि… आशू सिंगने या शाळकरी मुलाला स्वच्छ भारत मिशनचा खराखुरा ब्रँड अँबेसडर म्हटलं आहे. हा मुलगा दिल्लीतल्या कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे किंवा त्याचं नाव काय आहे, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. या पोस्टला 66 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक युझर्सनी कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलं आहे, “योग्य शिक्षणाचं नेमकं उदाहरण.” ‘हे जबाबदार तरुण आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करतील’, अशीही कमेंट अन्य एका युझरने केली आहे. आपण दररोज ज्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करतो त्यांची स्वच्छता आपणच राखली पाहिजे, अशी शिकवण या मुलाच्या कृतीतून मिळत आहे. इतरांनीही त्याचं अनुकरण केलं पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या