JOIN US
मराठी बातम्या / Viral / बिल गेट्सचा 'हा' Video जिंकेल मन, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बिल गेट्सचा 'हा' Video जिंकेल मन, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

‘मायक्रोसॉफ्ट’चे बिल गेट्स कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

बिल गेट्स

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : स्वयंपाक करणं ही एक कला आहे. अनेकदा तुम्ही अनेक प्रसिद्ध सेलेब्रिटीजना जेवण बनवताना पाहिलं असेल. यामध्ये आता ‘मायक्रोसॉफ्ट’चे बिल गेट्स यांचाही समावेश झाला आहे. गेट्स यांनी सेलेब्रिटी शेफ ईटन बर्नाथसोबत मिळून चपाती बनवल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओमध्ये, बर्नाथ गेट्स यांना चपाती कशी बनवायची हे शिकवताना दिसत आहे. भारतात बिहारला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान आपण ही रेसिपी शिकलो, असंही बर्नाथनं स्पष्ट केलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सेलेब्रिटी शेफ ईटन बर्नाथनं ट्विटरवर बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं आहे, “बिल गेट्स आणि मी एकत्र भारतीय चपाती बनवण्याचा प्रयत्न केला. मी नुकतंच भारतातल्या बिहारमधून परतलो आहे. तिथे मला गहू उत्पादक शेतकरी भेटले. पेरणीच्या नवीन तंत्रज्ञानामुळे त्यांचं उत्पादन वाढलं आहे. ‘दीदी की रसोई’ कॅन्टीनमधल्या महिलांनी मला चपाती (रोटी) बनवायला शिकवलं आहे.” हेही वाचा -  दुचाकीस्वाराची दादागिरी! स्वतः येऊन कारला धडकला, नंतर पाच किलोमीटर…, पाहा Video एका दिवसापूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून या क्लिपला 1.3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. जवळपास 900 लाइक्सदेखील त्या पोस्टला मिळाले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला शेफ बर्नाथ हा टेक अब्जाधीश बिल गेट्स यांची ओळख करून देतो आणि नंतर ते बनवणार असलेल्या डिशबद्दल सांगतो. गेट्स गोल चपाती बनवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. व्हिडिओच्या शेवटी दोघंही जण तुपासह चपातीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका ट्विटर युझरने कमेंट केली आहे, “लव्ह फ्रॉम इंडिया.” आणखी एका युझरने विनोदी कमेंट केली आहे. तो म्हणाला, “मी यापेक्षाही चांगली चपाती बनवेन. फक्त मला कामावर घ्या.” एका युझरने या व्हिडिओला मजेशीर म्हटलं आहे. त्यानं कमेंट केली आहे की, चपाती कशी बनवू नये, हे या व्हिडिओतून दिसत आहे. गेट्स यांना किचनमध्ये आणणारा ईटन बर्नाथ हा एक अमेरिकेतला प्रसिद्ध शेफ, लेखक, आणि उद्योजक आहे. जानेवारी 2023पर्यंत बर्नाथचे त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आठ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या