पटना, 22 जुलै: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनाचा संसर्ग भारतात वेगानं वाढत आहे. वारंवार प्रशासन आणि पोलिसांकडून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याबाबत आवाहन करुनही नागरिक या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. कधी दंड आकारून तर कधी शिक्षा करून नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पत्रकारानं गाढवाची मुलाखत घेतली आहे. विनामास्क आणि सॅनिटाइझ न करता रस्त्यावर बसलेल्या गाढवाची मुलाखत घेत असताना त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनाही हा पत्रकार प्रश्न विचारत आहे. या मुलाखतीमधून मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याबाबत जनजागृती केली जात असल्यानं सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे.
हे वाचा- ठेच लागली अन् नशीब चमकलं! मजुराला मिळाला 10.68 कॅरेट हिरा
हे वाचा- ‘गो Corona गो’: शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल, त्याचे PHOTOS पाहून व्हाल थक्क! जे लोक मास्क वापरत नाहीत अशांची तुलना गाढवासोबत करून नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं आहे. सोशल मीडियावर युझर्सकडून कौतुकाची थापही मिळत आहे. गाढवाची मुलाखत घेणाऱ्या या पत्रकाराचा व्हिडीओ पाहून चाँद नवाबची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. मास्क न घालणाऱ्या लोकांची गाढवासोबत तुलना करून या पत्रकारानं एकप्रकारे खिल्ली उडवली असली तरीही मास्क किती अत्यावश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनोख्या पद्धतीनं केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.