JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / भूलभुलैया! भारताच्या बडा इमामबाडासह जगात आहेत इतके चक्रव्यूह! येथून बाहेर पडणं आहे कठीण

भूलभुलैया! भारताच्या बडा इमामबाडासह जगात आहेत इतके चक्रव्यूह! येथून बाहेर पडणं आहे कठीण

सध्या भूलभुलैया 2 चित्रपट हिट झाला आहे. याआधीचाही भूलभुलैया 1 अशाच पद्धतीने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. मात्र, चित्रपटांमध्ये बहुतेककरून मानसिक पातळीवरील भूलभुलैया चित्रित केला आहे. यानिमित्ताने आपण इमारतींच्या किंवा इतर भौगोलिक पातळीवर असलेले भूलभुलैया म्हणजेच चक्रव्यूह कुठे आहेत हे जाणून घेऊ. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि विचित्र भूलभुलैया (Most interesting labyrinths from around the world) आहेत. जगभरातील सर्वात मनोरंजक चक्रव्यूह भारतासह जगात अनेक ठिकाणी आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का, की ते बनवण्याचा उद्देश काय असेल?

0108

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या खूप गाजतोय. त्याच्या पहिल्या भागात अक्षय कुमार (Akshay Kuamr), विद्या बालन (Vidya Balan) आणि शायनी आहुजा (Shiney Ahuja) मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचं नाव भूलभुलैया असं होतं. कारण, कथा अशा प्रकारे रचली गेली होती की, पात्रांचं जीवन चक्रव्यूहासारखे झालं होतं. परंतु चित्रपटांमधून बाहेर पडून आणि वास्तविक जीवनातही भारतासह जगात अनेक ठिकाणे आहेत, जिथे मनोरंजक चक्रव्यूह आहेत (Most interesting labyrinths from around the world). तुम्ही कधी विचार केला आहे का, की ते बनवण्याचा उद्देश काय असेल? सामान्यतः, भूलभुलैया भारतात (Bhool Bhulaiyya in India) तयार केले गेले. जेणेकरून, एखाद्या व्यक्तीचे लक्ष वेधण्याची शक्ती वाढते, त्याचं मन अधिक सक्रिय होतं आणि त्याच्यामध्ये सर्जनशील विचार येतात. कालांतराने, भूलभुलैयाचा (Bhool Bhulaiya) संबंध भय आणि साहसाशी जोडला गेला आहे आणि चित्रपटांनी नेहमीच भूलभुलैया अशाच प्रकारचे दाखवले आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध आणि विचित्र भूलभुलैयाबद्दल सांगणार आहोत. (फोटो: Canva)

जाहिरात
0208

बडा इमामबाडा - लखनऊच्या बडा इमामबाडापासून सुरुवात करूया. बडा इमामबाडाच्या आत वरच्या मजल्यावर एक चक्रव्यूह आहे. त्यात सुमारे एक हजार छोटे मार्ग आहेत, जे त्याला चक्रव्यूहाचा आकार देतात. 18व्या शतकात भारत जवळपास 11 वर्षे उपासमारीच्या खाईत होता. हा काळ प्रत्येकासाठी खूप कठीण होता. त्या काळात, 1784 मध्ये लखनौच्या नवाब असद-उद-दौला याने लोकांना रोजगार मिळावा म्हणून बडा इमामबाडा बांधण्याचा निर्णय घेतला. (फोटो: Canva)

जाहिरात
0308

हॅम्प्टन कोर्ट - ब्रिटनमधील सर्वात जुना भूलभुलैया हॅम्प्टन कोर्ट मेझ (Hampton Court Maze) आहे. हा 17 व्या शतकात बांधला गेला. सुमारे 800 मीटर लांबीचा हा चक्रव्यूह इथे येणाऱ्या पर्यटकांना चांगलाच गोंधळात टाकतो. लोकांचा असा दावा आहे की, जो येथे भटकतो तो काही वेळाने इतका हतबल होतो की, तो रडू लागतो. (फोटो: Twitter/@Lucy_Worsley)

जाहिरात
0408

लाँगलीट मेझ (Longleat Maze Britain) - ब्रिटनची लाँगलीट भूलभुलैया एकेकाळी जगातील सर्वात लांब झुडुपांनी बनलेली चक्रव्यूह होता. 2.7 किमी लांबीचा हा भूलभुलैया 1757 मध्ये बांधण्यात आला होता. इथे झुडपांनी बनवलेली सीमा आहे, उंच लाकडापासून बनवलेले पूल आहेत. (फोटो: Twitter/@BryanMatthews23)

जाहिरात
0508

व्हिला पिसानी - इटलीच्या (Italy) या चक्रव्यूहात (Villa Pisani Labyrinth) अनेक बंद मार्ग आणि झुडपांनी बनवलेल्या खूप उंच भिंती आहेत. या चक्रव्यूहात नेपोलियन स्वतः भरकटला, अशी एक कथा येथे प्रचलित आहे. मात्र, ती कथा खरी असल्याचा कोणताही पुरावा नाही. (फोटो: Twitter/@paul2974)

जाहिरात
0608

एशकॉम्ब मेज (Ashcombe Maze) - या चक्रव्यूहात (Ashcombe Maze, Australia) सायप्रसची झाडे (मॉन्टेरी सायप्रस ट्री) आहेत. ती इतके उच्च आहेत की, त्यांना छाटणंदेखील एक आव्हान आहे. अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. (फोटो: Twitter/@metamazeverse)

जाहिरात
0708

पीस मेझ- नॉर्दर्न आयर्लंड (Peace Maze, Northern Ireland) मध्ये असलेला हा चक्रव्यूह 2.7 एकरमध्ये पसरलेला आहे. ही एक अतिशय सोपा भूलभुलैया आहे. कारण, त्याच्या भिंती खूप लहान आहेत. (फोटो: Twitter/@cjhumanrights)

जाहिरात
0808

डोल प्लांटेशन पाइनैपल मेज Dole Plantation Pineapple Maze - हा अननसाच्या आकाराचा चक्रव्यूह (Dole Plantation Pineapple Maze, US) अमेरिकेतील हवाई येथे आहे. जर कोणी हा 4 किलोमीटरचा चक्रव्यूह ओलांडला तर त्याचा फोटो याच्या प्रवेशद्वारावर लावला जातो. (फोटो: Twitter/@DronePermission)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या