JOIN US
मराठी बातम्या / Viral / ''मैने पायल है छनकाई'' गाण्यावर सुंदर महिलेनं धरला ताल, डान्स असा की नेटकऱ्यांनाही लावलं वेड, पाहा VIDEO

''मैने पायल है छनकाई'' गाण्यावर सुंदर महिलेनं धरला ताल, डान्स असा की नेटकऱ्यांनाही लावलं वेड, पाहा VIDEO

आता हे नवीन वर्जन गाणं चर्चेत आलंय ते एका महिलेमुळे, या सुंदर महिलेनं या गाण्याचा असा काही ताल धरला की अगदी गायक नेहा कक्कर देखील तिची फॅन झाली आहे.

जाहिरात

गृहिणीच्या डान्सनं सोशल मीडियावर लावली आग

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 सप्टेंबर : नवरात्रीला सुरुवात झाली आणि दांडिया क्विन फालगुनी फाटकची आठवण नाही काढली, असं होणार नाही. पण सध्या फालगुनी फाटक चर्चेत आहे, ती तिच्या गाणाच्या रिमेकमुळे. ‘मैने पायल है छानकाई’ या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जन आला आहे, जे नेहा कक्कर ने गायलं आहे. हे गाणं रिलीज होताच त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काही लोक या व्हिडीओला पसंत करत आहेत, तर काही लोक या गाण्याला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर तर अगदी दोन्ही सिंगरचे फॅन एकमेकांसोबत भांडत आहेत. परंतू आता हे नवीन वर्जन गाणं चर्चेत आलंय ते एका महिलेमुळे,  या सुंदर महिलेनं या गाण्याचा असा काही ताल धरला की अगदी गायक नेहा कक्कर देखील तिची फॅन झाली आहे. तुम्ही व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की, एक महिला डोक्यावर पदर घेऊन डान्सची सुरुवात करते आणि नंतर ती आपल्या स्टेप्स आणि हावभावाने सगळ्यांचं मन जिंकून घेते. ही महिला गृहिणी असल्याचं दिसत आहे. पण ती या गाण्यावर जे काही नाचली आहे त्याला तोड नाही. म्हणूनच तर नेहा कक्करने देखील या महिलेची प्रशंसा केली आहे. नेहा कक्करला हा व्हिडिओ इतका आवडला आहे की तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. या महिलेच्या व्हिडीओवर तिला टॅग करत नेहानं लिहिलं की, ‘‘मुला तुझा डान्स खूप खूप आवडला, असंच आनंदी जगत राहा! माझं हृदय आनंदी होतं जेव्हा मी लोकांना हसताना पाहाते… स्पेशली आई, कारण त्या नेहमीच मेहनत करत असतात. अशा महिलांना आधार देणार्‍या पतींनाही सलाम!! आशीर्वाद!’’

नेहा कक्कर आणि तिने गायलेले नवीन गाणे लोकांच्या हृदयाला भिडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जो कोणी पाहतो तो या गाण्यावर रील बनवताना दिसतो. हा ट्रेंड एका महिलेनेही पुढे नेला आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हीही पाहा. या व्हिडिओने अनेकांचे खूप मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या महिलेचा डान्स लाखो लोकांनी पसंत केला आहे. अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिला आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या