JOIN US
मराठी बातम्या / Viral / पाण्यात पडलेल्या कावळ्यासाठी अस्वल ठरलं देवदूत; मुक्या प्राण्याने केलेलं काम पाहून व्हाल अवाक, VIDEO

पाण्यात पडलेल्या कावळ्यासाठी अस्वल ठरलं देवदूत; मुक्या प्राण्याने केलेलं काम पाहून व्हाल अवाक, VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कावळा पाण्यात बुडत आहे. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. मात्र त्याचे पंख पाण्यात भिजले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : आज जग अतिशय पुढे गेलं आहे. जग चंद्रावर पोहोचलं आहे आणि दुसऱ्या ग्रहांवर मानवी वस्ती बनवण्यासाठी तयारीही करत आहे. मात्र आजही जगात असे अनेक लोक आहेत, जे माणुसकी मात्र शिकलेले नाहीत. रस्त्यावर एखादी व्यक्ती वेदनेत असेल आणि मदत मागत असेल तर लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवू लागतात. अशात कोणी कोणाची मदत करेल अशी आशाही करणं सोडून द्यावं लागतं. मात्र आजकाल प्राण्यांमध्येच माणुसकी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका अस्वलाची माणुसकी पाहायला मिळते (Bear Saved Life of a Crow).

बिबट्याला काठीने डिवचत होता व्यक्ती; भडकलेल्या प्राण्यानं घडवली अद्दल, VIDEO

हे अस्वल पाण्यात बुडणाऱ्या एका कावळ्याला वाचवून माणुसकीचं उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवतं. अशावेळी एखादा माणूस फक्त डोळ्यांनी सर्व बघण्याचं काम करतो. मात्र अस्वलाने माणुसकी दाखवत जे काही केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कावळा पाण्यात बुडत आहे. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. मात्र त्याचे पंख पाण्यात भिजले आहेत. त्यामुळे पाण्यातून बाहेर निघणं त्याला शक्य होत नाही.

संबंधित बातम्या

इतक्यात शेजारीच उभा असलेल्या एका अस्वलाची नजर त्याच्यावर पडते. अस्वल आपल्या पायाच्या आणि तोंडाच्या मदतीने कावळ्याला पाण्यातून बाहेर काढतं. कावळा पाण्यातून बाहेर आल्यानंतर बराच वेळ जमिनीवर पडून राहातो आणि नंतर उठून बसतो.

बॅगमध्ये सापडली सर्वात विषारी सापाची 23 अंडी, अजबच दिसणारा अंड्यांचा Photo Viral

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हि़डिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, अस्वलाने बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं…आजकाल माणसांपेक्षा जास्त माणुसकी मुक्या प्राण्यांमध्ये दिसत आहे ना? अवघ्या 46 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या