JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'मैं झुकेगा नहीं' म्हणत नवरदेवाने मारली अल्लू अर्जूनची स्टाईल; नवरीने काय केलं पाहा, VIDEO

'मैं झुकेगा नहीं' म्हणत नवरदेवाने मारली अल्लू अर्जूनची स्टाईल; नवरीने काय केलं पाहा, VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमावेळी नवरदेव आणि नवरी स्टेजवर उभा आहेत. तर त्यांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि पाहुणे हा सुंदर क्षण आल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : सोशल मीडियाच्या दुनियेत गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग (Pushpa Famous Dialogue) ‘मैं झुकेगा नहीं…साला’ (Main Jhukega Nahi) चांगलाच गाजला आहे. स्टार्सपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण या डायलॉगवर रिल्स बनवत आहेत. अशातच आता एका लग्नातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. यातील नवरदेवही पुष्पा सिनेमातील या डायलॉगचा मोठा फॅन असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये दिसतं की कार्यक्रमावेळी नवरदेव अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये नवरीला वरमाळा घालण्यापासून थांबवतो. सुरुवातीला नवरदेवाचं हे कृत्य पाहून सगळे अचंबित होतात मात्र नंतर मंडपात एकच हशा पिकतो. नवरदेवाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Funny Video of Groom) होत आहे. जेव्हा आपसात भिडले दोन हत्ती; रेसलिंगचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमावेळी नवरदेव आणि नवरी स्टेजवर उभा आहेत. तर त्यांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि पाहुणे हा सुंदर क्षण आल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. नवरी आणि नवरदेव दोघांनीही हातात वरमाळा घेतलेली आहे. यादरम्यान नवरी नवरदेवाला वरमाळा घालण्यासाठी पुढे येते. मात्र इतक्यात नवरदेव तिला थांबवतो, हे पाहून आसपासचे सगळेच अवाक होतात. यानंतर नवरदेव नवरीला अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये म्हणतो, ‘मैं झुकेगा नहीं साला.’ हे ऐकताच तिथे उपस्थित सर्वच हसू लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव अल्लू अर्जूनप्रमाणेच आपल्या दाढीवरुन हातही फिरवतो.

संबंधित बातम्या

वरमाळेच्या कार्यक्रमाचा हा मजेशीर व्हिडिओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ट्विस्टसोबत वरमाळा, मैं झुकेगा नहीं साला.’ काही तासापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा वाढतच आहे.

तब्येत बरी नसल्याने रुग्णलयात पोहोचली तरुणी; रिपोर्ट पाहताच सरकली पायाखालची जमीन

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनेही यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने नवरदेवाला सल्ला देत लिहिलं, ‘अभी मत झुक भाई, आगे बर्तन धोने के लिए झुकना पड़ेगा.’ तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, एका चित्रपटाच्या नादाने सगळेच वेडे झाले आहेत. आणखी एका यूजरचं म्हणणं आहे की ट्विस्ट तर तेव्हा येतो, जेव्हा नवरी लग्न करण्यास नकार देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या