मुंबई, 18 एप्रिल : जगातील जवळपास सर्वच देश कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. यामध्ये लोकांना घरात राहण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आवाहन करण्यात येत आहे. सध्या असंच लोकांना घरातच रहा असं सांगणारा फोटो व्हायरल होत आहे. एका कलाकाराने हा फोटो शेअर केला आहे. यातून कोरोनाशी लढण्याची नवी उमेद देण्याचा प्रयत्न केला आहे. वरवर पाहिलं तर पुस्तकांच्या कपाटाचा एक साधा फोटो आहे असं वाटेल. ब्रिटनमधील डिजिटल प्रिंटमेकर फिल शॉ यांनी हा फोटो शेअर केला आहे. बुकशेल्फ अशा पद्धतीनं सजवलं की त्यातून सोशल डिस्टन्सिंगबाबत एक मेसेज लोकांना मिळेल. फिल यांनी सजवलेल्या या बुकशेल्फमध्ये स्टीफन किंग यांचं इट, जिंजर सिम्पसन यांचं होप स्प्रिंग्स इटरनल आणि मार्क बिलिंगम यांचे इन द डार्क यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे. एक आठवड्यापुर्वी फिल शॉ यांनी हा फोटो पोस्ट केला होता. त्यात म्हटलं होतं की, सेल्फ आय़सोलेशनची पूर्ण कथा. फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल की यामध्ये कशाप्रकारे सोशल डिस्टन्सिंगचा मेसेज देण्यात आला आहे. पुस्तकांची मांडणी करताना असा क्रम निवडला की त्यातून एक संदेश जाईल. शेवटी डोन्ट गो आऊट हे सांगण्यासाठी तीन पुस्तके त्यांनी एका बाजुला क्रमाने ठेवली आहेत. त्यांचा हा मेसेज देण्याचा अंदाज लोकांना आवडला आहे.
पुस्तकांच्या मांडणीतून तयार केली कथा एका परदेशी रूग्णाला समुद्र किनाऱ्यावर पकडण्यात आलं. मी घरीच रहायला हवं असं ती म्हणाली, आता ती एका अंधाऱ्या खोलीत क्वारंटाइन झाली. यानंतरही आशा आहे की स्वच्छता आणि स्वत:ला यापासून वेगळं ठेवून एक चांगलं आयुष्य नक्कीच मिळेल. कोरोनाचं हे भयकथेचं पुस्तकही लवकरच संपेल.नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वच्छ हात तुमचं जीवन वाचवतील आणि जर शंका असेल तर बाहेर जाऊ नका. या फोटोच्या आधीसुद्दा सोशल डिस्टन्सिंगचा मेसेज देणारा फोटो त्यांनी शेअर केला होता.
सोशल डिस्टन्सिंगचा हा मेसेज जगभर व्हायरल झाला आहे. पुस्तकांच्या मांडणीतून सोशल डिस्टन्सिंगवर अशी कथा तयार करून त्यातून हात स्वच्छ ठेवा, संकट लवकरच जाईल आणि घराबाहेर पडू नका असंही सांगण्यात आलं आहे. हे वाचा :‘कोरोनाच्या संकटातही प्रेम आणि आशेचा किरण’, नर्स दाम्पत्याचा PHOTO VIRAL