JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय डोकं आहे राव! दारूच्या दुकानात पाळलं खरं सोशल डिस्टन्सिंग, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट VIDEO

काय डोकं आहे राव! दारूच्या दुकानात पाळलं खरं सोशल डिस्टन्सिंग, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट VIDEO

या व्हिडीओमध्ये दारूच्या दुकानात सोशल डिस्टन्सिंग हटके पद्धतीनं पाळल्याचं दिसत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 जून : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे (social distancing) पालन करणं बंधनकारक मानले जात आहे. यासाठी जगभरातून सामाजिक अंतर पाळणं गरजेचे सांगितले जात आहे. तरी, अद्यापही लोकं ही गोष्ट गांभीर्यानं घेताना दिसत नाही आहेत. यातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्हिडीओमध्ये दारूच्या दुकानात सोशल डिस्टन्सिंग हटके पद्धतीनं पाळल्याचं दिसत आहे. दारू विकणाऱा एक दुकानदार भन्नाट जुगाड करून विक्री करत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बिअर शॉपच्या बाहेर एक मोठा पाइप लावण्यात आलेला दिसत आहे. पाइपच्या दुसऱ्या बाजूला व्यक्तीनं आपल्यी चिठ्ठी टाकल्यानंतर पाइपमधूनच त्याला सामना दिलं जातं. ग्राहक दुकानदाराला पैसेही याच पाइपमधून देतात. वाचा- VIDEO: इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि…

संबंधित बातम्या

वाचा- डोळ्यांत पाणी आणेल हा मैत्रिचा VIDEO, मित्रावर अंत्यसंस्कार करण्याआधी असा खेळला सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून म्हटले आहे की ही क्लिप गेल्या काही काळापासून व्हायरल होत आहे. यांच्या हुशारीचं कौतुक आहे. ही डिझाइन खरतर सोशल डिस्टन्सिंगचे चांगलं उदाहरण आहे. वाचा- VIDEO : कुत्र्यासमोर बिबट्यालाही मानवी लागली हार, पाहा नेमकं काय घडलं महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यास एक हुशार कल्पना म्हटलं पण त्यास असभ्यही म्हटल आहे. मात्र भविष्यात या कल्पनेला अधिक चांगल्या पद्धतीने रुपांतर करण्याबद्दल त्यांनी निश्चितपणे सांगितले. संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या