JOIN US
मराठी बातम्या / Viral / Amazon Delivery बॉय असा झाला कोट्यवधींचा मालक, आधी खायलाही नव्हते पैसे आता फिरतो 2 कोटींच्या गाडीत

Amazon Delivery बॉय असा झाला कोट्यवधींचा मालक, आधी खायलाही नव्हते पैसे आता फिरतो 2 कोटींच्या गाडीत

आता तुमच्याही मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की, हे कसं शक्य आहे? किंवा त्यानं नेमकं काय केलं, कुठून आणले एवढे पैसे ज्यामुळे या तरुणाच्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन 22 ऑगस्ट : मेहनत आणि चिकाटी असेल, तर तुम्हाला तुमच्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. असं म्हणतात की, जो मेहनत करतो, त्याचं फळ त्याला नेहमी मिळतं आणि असंच काहीसं या तरुणासोबत घडलं. खरंतर हा तरुण अ‍ॅमेझॉनमध्ये डीलिव्हरी बॉयचं काम करत होता. जो नंतर अचानक करोडपती झाला. याच कारणामुळे तो चर्चेचा विषय ठरला. आता तुमच्याही मनात असा प्रश्न उपस्थीत झाला असेल की, हे कसं शक्य आहे? किंवा नक्की असं काय घडलं असेल, ज्यामुळे या तरुणाच्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला? तर यामागचं कारण आहे क्रिप्टोकरंसी. हो हे खरं आहे. या 28 वर्षीय तरुणाचं नाव कैफ भट्टी आहे. जो लंडनमधील वेस्ट ड्रेटनमध्ये राहायचा. तो युनिवर्सिटीमधून ग्रॅज्युएट होताच, अ‍ॅमेझॉनमध्ये डीलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला. खरंतर कैफ भट्टीला कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याचे प्रोफेसर आणि मित्र त्याच्या परिस्थितिवरुन हिणवायचे आणि त्याची टिंगल करू लागले होते. त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं असं कैफ भट्टीने ठरवलं होतं. परंतु परिस्थिती त्याला पुढे येण्याची संधी देत नव्हती. त्यावेळी कॅफ भट्टीने अ‍ॅमेझॉन डीलिव्हरी बॉयचं काम सुरु केलं. येथे तो दररोज 14 तासांची ड्युटी करायचा आणि मेहनत करुन जास्तीत जास्त पैसे कसे जमा करता येईल? याचा विचार करायचा. तेव्हा त्याने ठरवले की आयुष्यभर हेच काम करुन आपल्याला जास्त पैसे कमावता येणार नाही, त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहेत.

पाहा व्हिडीओ : Turkey Road Accident: आधी कार धडकली आणि मग अनियंत्रित बस थेट गर्दीला चिरडत निघाली; अंगावर काटा आणणारा Video

ज्यानंतर कॅफ भट्टीने एक रिस्की निर्णय घेतला आणि त्याने आपले सगळे साठवलेले पैसे क्रिप्टोकरंसीमध्ये (cryptocurrency) गुंतवले. त्यावेळी खरंतर त्याने ‘Verge’नावाच्या कॉईनमध्ये 66 हजार रुपये लावले आणि तसेच राहू दिले. ज्यानंतर या कॉईनमध्ये अचानक तेजी आली आणि त्याची किंमत वाढू लागली. या इन्वेस्टमेंटमध्ये त्याने 28 लाख रुपये कमवले, ज्यानंतर त्याने अ‍ॅमेझॉनची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि क्रिप्टोमध्येच (cryptocurrency) पैसे गुंतवण्याचा त्याने निर्णय घेतला.

कैफ भट्टीने क्रिप्टोसंदर्भात आणखी माहिती गोळा केली आणि आपल्याकडे असलेले पैसे पुन्हा गुंतवण्यासाठी सुरुवात केली. ज्यानंतर अगदी काहीच महिन्यात त्याने 5 कोटी रुपये कमावले आणि एका वर्षानंतर त्याची इनकम दुप्पट झाली. पैसे आल्यानंतर कैफ भट्टी दुबईला शिफ्ट झाला, जेथे त्याने स्वत:साठी 6 कोटी रुपयांचे पेंटहाऊस अपार्टमेंट विकत घेतलं. तसेच त्याने 2 कोटी रुपयांची कार देखील विकत घेतली. आता कॅफ भट्टी हा काहीही काम करत नाही, तो फक्त पैसे इन्वेस्ट करो आणि पैसे कमवतो. त्याने या सगळ्याला आपलं काम बनवलं आहे. ज्यामधून त्याला भरघोस पैसा मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या