मुंबई, 30 ऑगस्ट : जाळं विणताना आणि भिंतीला चिकटून बसलेला कोळी (spiders) तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण तुम्ही या कोळ्यांशी खेळणारी मुलगी (girl playing) कधी पाहिली आहे का ? ट्विटरवर एक व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत असून, यामध्ये एक लहान मुलगी ‘फनेल वेब स्पायडर’ (funnel web spider) या धोकादायक (dangerous) आणि विषारी कोळ्यांसोबत खेळताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या लहानगीला ‘स्पायडर गर्ल’ (spider girl) अशी उपमाच देऊन टाकलीय. पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी (different types of animals) आहेत. काही दिसायला धोकादायक असतात, आणि ते आकारानेही मोठे असतात. त्यांना पाहिल्यानंतरच अनेकांना घाम फुटतो. परंतु काही प्राणी असे आहेत, जे दिसायला इतके मोठे नसतात, मात्र, त्यांना विषारी मानलं जातं. अशा प्राण्यांमध्ये विंचू, सरड्याच्या काही प्रजाती आणि कोळी यांचा समावेश होतो. हे प्राणी चावल्यानंतर त्यांच्या विषामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, एक लहानगी चक्क विषारी कोळ्यांसोबत अशा पद्धतीने खेळते, जणू काही ते जिवंत कोळी नसून तिचं खेळणं आहे. धोकादायक कोळी तुम्ही अनेक ठिकाणी कोळी पाहिले असतील. ते काही सेकंदांत जाळं विणतात. कोळी लहान असतील तर ते जास्त नुकसान करत नाहीत, परंतु काही मोठे कोळी खूप धोकादायक आणि विषारी असतात. या विषारी कोळ्यांमध्ये फनेल वेब स्पायडरचं नावदेखील समाविष्ट आहे, जो त्याच्या विषासाठी जगभरात ओळखला जातो. मात्र, याच कोळ्यांसोबत एक लहानगी खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये काय? व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मोठमोठ्या कोळ्यांशी बेधडकपणे खेळताना दिसत आहे, जणू ती एखाद्या खेळण्याशी खेळत आहे. व्हिडिओमध्ये दोन महाकाय कोळी जमिनीवर फिरताना दिसत आहेत. तितक्यात ती मुलगी येते, आणि न घाबरता त्यातील एका कोळ्याला हातावर घेऊन त्याच्यासोबत खेळू लागते. कधी ती एका हातावरून दुसऱ्या हातावर कोळी सोडते, तर कधी ती दुसऱ्या कोळ्याला पाठीवर चिकटवते. विशेष म्हणजे, खेळत असताना कोळीही मुलीला काही करताना दिसत नाही. त्यामुळे कदाचित हे कोळी पाळीव असावेत, असाही अंदाज काहीजणांनी लावलाय. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला नको त्या ठिकाणी चावला कुत्रा; तरुण रुग्णालयात हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर बेस्ट व्हिडिओज नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीला ‘स्पायडर गर्ल’ असं नाव देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ नवीन नसला तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी त्याला लाईक केला आहे.