ब्राझिलिया 22 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्याला कधी काय पाहायला मिळेल याचा काही नाही नेम नाही. इथे एकादी गोष्ट काही तासातच गोष्टी ट्रेंड होऊ लागतात. यामध्ये फोटो, व्हिडीओ किंवा एखाद्या कण्टेट समावेश आहे. सध्या अशीच एक माहिती समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हो हे खरं आहे. जिथे एका व्यक्तीला आपली एक बायको सांभाळताना नाकी नऊ येतात. तिथे एका व्यक्तीच्या दोन-तीन नाही तर चक्कं आठ बायका आहेत. या प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल आणि इन्फ्ल्यूएन्सरचं नाव आर्थर उर्सोला आहे. हा व्यक्ती आपल्या आठ बायकांसोबत एकाच घरात राहातो. या बायकांसोबत आनंदाने राहाण्यासाठी आर्थर उर्सोने 7500 चौरस फुटांचा एक आलिशान महाल बांधला आहे. ज्याला त्याने ‘मॅनशन ऑफ फ्री लव्ह’ असं नाव दिलं आहे. आठ नाही तर नऊ महिलांशी लग्न आर्थर उर्सोने 2021 मध्ये एकाच वेळी 9 मुलींशी लग्न केलं. त्याच्या या आगळ्या-वेगळ्या आणि विचित्र गोष्टीने सर्वत्र खळबळ उडवून दिली. परंतु नंतर आर्थरच्या पत्नींपैकी एकीने घटस्फोट घेतला, कारण तिला तिचा नवरा इतर कोणत्याही स्त्रीबरोबर शेअर करायचा नव्हता. तसे पाहाता कायद्याने आर्थर उर्सोनेचं लग्न कायदेशीर नाही, कारण ब्राझीलमध्ये एकापेक्षा जास्त महिलांशी विवाह करणे कायद्याच्या विरोधात आहे. पण, आर्थर त्याच्या आयुष्याबद्दल खूप उत्साही आहे आणि त्याच्या बायकाही त्याच्यावर खूप खूश आहेत. वाचा बातमी : काय क्रिएटिव्हटी आहे राव! आयुष्यात कधीच पाहिलं नसेल असं हटके Wedding Card Viral; सोशल मीडियावर याचीच चर्चा अर्थर जरी त्याच्या या आयुष्यात खुश असला, तरी देखील त्याच्या आजुबाजूचे लोक मात्र यापासून खूश नाहीत. त्याच्या घराच्या एका भिंतीवर कोणीतरी राक्षस असं लिहिलेलं आहे. लोकांनी त्याला त्यांच्या शहरातून बाहेर जाण्यासाठी देखील सांगितलं आहे. या ‘राक्षस परिवार, दूर जा, आम्ही तुमचे स्वागत करणार नाही.’ यावर आर्थर सांगतात की, तो दिवस खूप निराशाजनक होता, जेव्हा हे भिंतीवर लिहिले होते. आम्हाला शांतता हवी आहे. त्यांनी सांगितले की, सकाळी बांधकाम पथक आल्यानंतर मी गेट उघडले तेव्हा मला समजले की भिंतीवर कोणीतरी असा संदेश लिहिला आहे.
आपल्या बायकांना वेळ देण्याबद्दल आर्थरने सांगितले की, आठ बायकांना वेळ देणं तसं सोपं नाही, त्यामुळे त्याने तसं शेड्यूल बनवलं आहे. ज्याच्या आधारे तो आपल्या सगळ्या बायकांना वेळ देतो. आश्चर्याची गोष्ट अशी की आर्थर आपल्या बायकांना शेड्यूल प्रमाणे प्रेम करतो, जे ऐकताना फारच हस्यास्पद आहे. आर्थर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे तो आपल्या बायकांसोबत नेहमीच तेथे फोटो शेअर करत असतो.