JOIN US
मराठी बातम्या / Viral / Ajab gajab : पॅकेटवरचा पत्ता वाचून डिलिव्हरी बॉय कन्फ्यूज; सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Ajab gajab : पॅकेटवरचा पत्ता वाचून डिलिव्हरी बॉय कन्फ्यूज; सोशल मीडियावर फोटोची चर्चा

जोधपूरमधल्या एका व्यक्तीनं फ्लिपकार्टवरून शॉपिंग करताना विचित्र पद्धतीने पत्ता नमूद केला. हा पत्ता वाचल्यानंतर डिलिव्हरी बॉय संभ्रमात पडला.

जाहिरात

व्हायरल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 जानेवारी : आजकाल मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा बहुतांश लोक ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे साहजिकच ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. बऱ्याचदा ऑनलाइन शॉपिंगबाबत अनेक घटना आपण ऐकतो. पार्सल वेळेत न देणं, वस्तू खराब असणं, डिलिव्हरी बॉयशी संबंधित घटनांचा यात समावेश असतो. तसंच काही वेळा पत्ता व्यवस्थित न दिल्याने डिलिव्हरी बॉयला ऑर्डर योग्य लोकेशनवर पोहोचवताना अडचणी येतात. सध्या अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील एका व्यक्तीने ऑनलाइन वस्तू मागवताना घराचा पत्ता व्यवस्थित न दिल्याने डिलिव्हरी बॉय संभ्रमात पडला. सध्या या पत्त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सदेखील केल्या आहेत. हे ही पाहा : Google Search करुन मिळवलेली माहिती अशी ठरु शकते धोकादायक देशभरातील लोक आता घरबसल्या ऑनलाइन वस्तू मागवण्यास प्राधान्य देतात. मात्र काही लोक डिलिव्हरी करण्याच्या ठिकाणचा पत्ता विचित्र पद्धतीने लिहितात. यामुळे वस्तू नेमक्या कोणत्या लोकेशनला पोहोच करायची असा संभ्रम डिलिव्हरी बॉयचा होतो. सध्या असाच एक प्रकार राजस्थानमधील जोधपूरमध्ये घडला आहे. एका व्यक्तीनं त्याच्या घराचा पत्ता अशा पद्धतीनं लिहिला की तो वाचल्यावर प्रत्येकजण संभ्रमात पडत आहे. या पत्त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

ऑनलाइन शॉपिंग केल्यावर त्याची डिलिव्हरी योग्य होण्यासाठी पत्ता अचूक असणं गरजेचं आहे. कारण जीपीएस किंवा इलेक्ट्रॉनिक मॅपच्या आधारे डिलिव्हरी बॉय आपल्या घरापर्यंत या वस्तू पोहोचवत असतात. पूर्वी या सुविधा नव्हत्या. तसेच दुर्गम किंवा ग्रामीण भागात घरांना नंबरही नव्हते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा पत्ता लोकांना विचारावा लागत असे. पण सध्याच्या काळात अचूक पत्ता देणं गरेजंच आहे. ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू घरी येण्यासाठी घराजवळची खूण पत्त्यात नमूद करणं गरजेचं आहे. मात्र जोधपूरमधल्या एका व्यक्तीनं फ्लिपकार्टवरून शॉपिंग करताना विचित्र पद्धतीने पत्ता नमूद केला. हा पत्ता वाचल्यानंतर डिलिव्हरी बॉय संभ्रमात पडला. निशांत नावाच्या यूजरनं ट्विटरवर फ्लिपकार्ट डिलिव्हरी पॅकेटवरील पत्त्याचा फोटो शेअर केला आहे. हा पत्ता वाचल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरलं नाही. अर्थात हा संदेश पत्ता वाचू इच्छिणाऱ्यासाठी आहे. काही युजर्सनं यावर कमेंट केल्या आहेत. त्यात एक यूजर लिहितो, “तुम्हा लोकांना माहीत नसेल पण पत्ता असा लिहिला जातो.” दुसरा एक युजर कमेंटमध्ये लिहितो, “भावानं अभ्यास कमी केला पण घराच्या पत्त्याचा अभ्यास जास्त केला आहे. ठसोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

राजस्थानमधील जोधपूरला पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी लिहिलेला पत्ता असा होता, भिकाराम, हरिसिंह नगर गिलकोर गावाच्या अलीकडे एक किलोमीटरवर उजव्या बाजूला आमच्या शेताचं लोखंडी गेट आहे,त्याच्या जवळच एक लहान गेट आहे आणि त्याच्या जवळ काळी कमान आहे, तिथं पोहोचल्यावर फोन करावा, मी वस्तू घ्यायला येईन. जिल्हा- जोधपूर, 342312, राजस्थान. हा पत्ता वाचल्यानंतर डिलिव्हरी बॉयची काय अवस्था झाली असेल, याचा विचार न केलेला बरा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या