JOIN US
मराठी बातम्या / Viral / हे शिव मंदिर वैज्ञानिकांसाठीही कोडं, कधीच विझत नाही अग्निकुंडातील अखंड ज्वाळा!

हे शिव मंदिर वैज्ञानिकांसाठीही कोडं, कधीच विझत नाही अग्निकुंडातील अखंड ज्वाळा!

सध्या सोशल मीडियावर (Social Media) शेजारच्या बांगलादेशातील (Bangladesh) प्राचीन शिव मंदिराची (Shiv Mandir) जोरदार चर्चा आहे. हे शिवमंदिर चमत्कारिक आहे. येथील अग्निकुंडातून सातत्यानं निघणाऱ्या ज्वाळा हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ढाका, 24 सप्टेंबर : हिंदू धर्माचं आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री शंकरांना चमत्कारांचा स्वामी मानलं गेलं आहे. केवळ भारतातच नाही तर अफगाणिस्तान, बांगलादेशासह शेजारील देशांमध्येही श्री महादेवाची अनेक मंदिरं आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) शेजारच्या बांगलादेशातील (Bangladesh) प्राचीन शिव मंदिराची (Shiv Mandir) जोरदार चर्चा आहे. हे शिवमंदिर चमत्कारिक आहे. येथील अग्निकुंडातून सातत्यानं निघणाऱ्या ज्वाळा हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या प्राचीन शिव मंदिरातील अग्निकुंडातील ज्वाळा सर्वसामान्य लोकांसह वैज्ञानिकांना देखील आश्चर्यचकित करत आहेत. लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या या शिव मंदिरात आजही भक्त येऊन मंदिरातील कुंडात सातत्यानं तेवत असलेल्या दिव्य ज्वाळांचं दर्शन घेतात. या ज्वाळांचा स्त्रोत कोणता आहे, त्यात इंधन कुठून येतं, याविषयी आजही कोणालाही माहिती नाही. तरीदेखील या ज्वाळा अखंडपणे पेटलेल्या असणं हा चमत्कार मानला जात आहे.

ट्विटरवर शेअर झाली छायाचित्रे या अद्भूत मंदिराविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. मात्र जेव्हा बांगलादेश हिंदू युनिटी काउंसिलनं (Bangladesh Hindu Unity Council) ट्विटर अकाउंटवरून या मंदिराची छायाचित्रं शेअर केली, तेव्हा ती पाहणाऱ्यांना विश्वास बसला नाही. त्यामुळे सध्या हे मंदिर संपूर्ण जगासाठी आश्चर्यचा केंद्रबिंदू ठरले आहे. बांगलादेश हिंदू युनिटी काउंसिलनं ही छायाचित्र शेअर करताना म्हटलं आहे की, अग्निकुंड महादेव मंदिर हे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर चित्तगाव येथे आहे. या मंदिरात नेहमीच आगीच्या ज्वाळा तेवत असतात. या ज्वाळांचा स्त्रोत नेमका कोणता आहे, याविषयीचा शोध अद्याप एकही पुरातत्व अभ्यासक किंवा तज्ज्ञ लावू शकलेला नाही. या मंदिराचं अग्निकुंड महादेव मंदिर असं नामकरण करण्यात आलं आहे. न उलगडलेलं कोडं ठरलयं हे अग्निकुंड अग्निकुंडातील ज्वाळांच्या स्त्रोताविषयी अद्याप कोणीही पुरातत्व अभ्यासक माहिती देऊ शकलेला नाही, ही बाब काउंसिलनं नुकतीच ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत स्पष्ट केली. छायाचित्रांमध्ये मंदिरातील अग्निकुंडात ज्वाळा स्पष्टपणे दिसत आहेत. ही छायाचित्रं पाहून हर-हर महादेव अशा कॉमेंटस या पोस्टवर नेटिझन्स देत आहेत. काही लोकांनी मंदिराच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील प्राचीन शिव मंदिरा व्यतिरिक्त श्रीलंका (Sri Lanka) आणि कंबोडियात (Cambodia) अनेक विशाल शिवमंदिरं आहेत. श्रीलंकेतील अडीच मैल लांब आणि 650 फूट रुंद मंदिर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणलं जातं. कंबोडियातील भगवान विष्णू मंदिरात आजही पूजाविधी केले जातात. हे जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या