लंडन, 21 जुलै : पोटात दुखू लागलं, कळ आल्यासारखी वाटली की सर्वात आधी आपण टॉयलेटमध्ये जातो. ब्रिटनमधील एका 22 वर्षांच्या मुलीनेही तेच केलं. पण टॉयलेटमध्ये जाताच तिने अचानक बाळाला जन्म दिला. बाळाला पाहून तीसुद्धा हैराण झाली. कारण आपण प्रेग्नंट आहोत, हे तिलाच माहिती नव्हतं. कारण तिच्यात प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं नव्हती. उलटी, मळमळ, चक्कर आणि त्यानंतर काही महिन्यात पोट वाढणं म्हणजे बेबी बम्प दिसणं ही प्रेग्नन्सीची लक्षण आहेत. पण एअरहॉस्टेस असलेल्या लुसी जोन्समध्ये अशी कोणतीच लक्षणं दिसली नाहीत. तिने टॉयलेटमध्ये अचानक बाळाला जन्म दिला आहे. लुसीच्या दाव्यानुसार, तिला मासिक पाळी येत होती. ती गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. काही दिवसांपूर्वीच एअरलाइन्सनेही तिची चाचणी केली, ज्यात ती फिट टू फ्लाय असल्याचं सांगण्यात आलं. नुकत्आच केलेल्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये ती दोन वेळा निगेटिव्ह आली. या कालावधीत ती जवळपास 10-15 वेळा क्लबमध्ये गेली होती, बऱ्याच पार्ट्याही तिने अटेंड केल्या. ती दारूही प्यायली होती. हे वाचा - वारंवार जुळी होत असल्याने संतप्त झाला नवरा; पाचव्यांदाही ट्विन्स होताच रागात बायको, मुलांना… आपल्या डिलीव्हरीबाबत एका न्यूज एजेन्सीशी बोलताना तिने सांगितलं, एके रात्री बेडवर असताना अचानक तिच्या पाठीत आणि पोटात वेदना होऊ लागल्या. वेदना तीव्र नव्हत्या, सहन करण्याइतक्या हलक्या होत्या. आता टॉयलेटला जाण्याची गरज आहे, असं वाटू लागलं. घाईघाईत मी टॉयलेटला गेली आणि तिथंच बाळाचा जन्म झाला. टॉयलेटमध्ये मी बाळाला पाहिलं नाही तोपर्यंत मला मी प्रेग्नंट आहे हे माहितीच नव्हतं. ज्यावेळी डिलीव्हरी झाली तेव्हा लुसी एकटीच घरी होती. तिने मदतीसाठी लगेच अॅम्ब्लुन्सला क़़ॉल केला. लुसी आणि तिची मुलही रूबी एकदम व्यवस्थित आहे. रूबी आता चार महिन्यांची झाली आहे. हे वाचा - Stretch Marks : क्रीम्सची गरजच नाही; घरगुती उपाय करून घालवा प्रेग्नन्सी स्ट्रेच मार्क्स प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. डेली मेल च्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी (cryptic pregnancy) किंवा प्रेग्नन्सी डिनाइल (pregnancy denial) म्हणतात. तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंवा अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापरत नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. पण एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते.