JOIN US
मराठी बातम्या / Viral / एकाच गावात 15 बायकांसोबत राहतो 'हा' पुरूष, 107 मुलांचा आहे बाप, पाहा VIDEO

एकाच गावात 15 बायकांसोबत राहतो 'हा' पुरूष, 107 मुलांचा आहे बाप, पाहा VIDEO

World’s Biggest Family: 15 बायका आणि 107 मुलांसह ही व्यक्ती एकाच गावात राहते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 सप्टेंबर:  जगातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी (World’s Biggest Family) एका कुटुंबाचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. डेव्हिड साकायो कालुहाना (David Sakayo Kaluhana) नावाच्या आफ्रिकन माणसाला 15 बायका आणि 107 मुलं आहेत. ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? महत्त्वाचं म्हणजे 61 वर्षीय डेव्हिड हे पश्चिम केनियातील (Western Kenya) एका गावात या भल्यामोठ्या कुटुंबात आनंदाने आपल्या सर्व पत्नी आणि मुलांसह राहत आहेत. Afrimax Englishच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये डेव्हिड कालुहाना असं म्हणाले की, माझा बुद्ध्यांक म्हणजे IQ खूप चांगला आहे, त्यामुळे मला सांभाळणं ही एका पत्नीच्या आवाक्यातली गोष्ट नाही. खरं तर डेव्हिड हे एक इतिहासकार (historian) आहेत आणि आपण 4000 हून अधिक पुस्तकं वाचल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या सर्व बायका आपापली कामं वाटून घेतात आणि एकमेकांबरोबर आनंदाने राहतात, असं व्हिडिओमध्ये डेव्हिड यांनी सांगितलं. त्यांच्या सर्व बायका त्यांना राजाप्रमाणे वागवतात, असंही डेव्हिड म्हणाले. दरम्यान, त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव जेसिका कालुहाना (Jessica Kaluhana) आहे. तिला 13 मुलं आहेत. ती सांगते, ‘त्यांनी नवीन बायको घरी आणल्याबद्दल मला कधीही ईर्ष्या वाटली नाही. ते पती म्हणून जबाबदार व्यक्ती आहेत. ते जे करतात, ते नेहमीच बरोबर असतं, कारण ते कोणतीही गोष्ट पुरेसा विचार करूनच करतात.’ तर, संपूर्ण कुटुंब आनंदाने राहत असल्याचं डेव्हिड यांची सातवी पत्नी रोझ कालुहाना (Rose Kaluhana) यांनी सांगितलं.

अधिक महिलांशी लग्न करण्याविषयी बोलताना डेव्हिड म्हणाले की, ‘मी राजा सॉलोमनकडून (King Solomon) प्रेरणा घेतोय, ज्यांच्या 1000 बायका होत्या. मी स्वत:ला सॉलोमनपेक्षा कमी समजत नाही, म्हणूनच अधिकाधिक महिलांशी लग्न करेन आणि त्यांना पत्नी करून घेईन.’ Video : रेल्वे फाटक बंद असताना ही त्यानं ते ओलांडलं, भरधाव ट्रेनलाही नाही जुमानलं अखेर… यूट्यूबवरील या व्हिडिओला 2 लाख व्ह्युज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणाला, “लोभ हे पाप आहे. मी सर्व संस्कृती आणि परंपरांचा आदर करतो, परंतु 1 पुरुष 15 महिला आणि 100+ मुलांमध्ये समान रीतीने विभागला जाऊ शकत नाही. पण देव त्यांना आशीर्वाद देवो.” ‘पती लक्ष देत नाही, अशी तक्रार तुमच्या कुटुंबात केली जात नसावी, असं मला वाटतं. मला नवल वाटतंय की खरंच त्याला त्याच्या सर्व मुलांची आणि पत्नींची आणि कोणती मुलं कोणत्या पत्नीची आहेत हे माहीत आहे का? ते एक कुटुंब असल्याने मी त्यांना शुभेच्छा देतो,’ असं आणखी एका युझरने म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या