JOIN US
मराठी बातम्या / Viral / ...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL

...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL

धडकी भरवणारा 36 सेकंदाचा VIDEO. इंडिकेटर न देता लेन बदलल्यामुळे पाहा काय झालं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अबु धाबी, 20 ऑगस्ट : रस्ते अपघात भारतातच जास्त प्रमाणात होत असतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते खोटे आहे. नुकताच अबु धाबी पोलिसांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये हायवेवरील भीषण अपघात दिसत आहे. अचानक दोन गाड्यांनी लेन बदलल्यामुळे काय झालं, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 36 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये पाचव्या लेनमध्ये असलेली एक बस इंडिकेटर देऊन लेन बदलत असताना एक ट्रक आला. बसशी होणारी धडक टाळण्यासाठी ट्रकनं अचानक ब्रेक दाबला मात्र शेजारच्या गाडीला जाऊन ट्रक आदळला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हायवेच्या अगदी टोकाशी जाऊन ट्रक आदळला. या धडकेत सेडन गाडी दोन लेन सोडून लांब फेकली गेली, त्यामुळे शेवटच्या लेनमधल्या SUVला जाऊन आदळली. या अपघातमुळे 4 गाड्याचे नुकसान झाले. वाचा- पावसामुळे रस्ता धजला अन् जमिनीखाली गाडल्या गेल्या 21 गाड्या, पाहा VIDEO

संबंधित बातम्या

वाचा- मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शची झाली टक्कर, नुकसान ऐकून येईल चक्कर; पाहा हे PHOTOS हा व्हिडीओ अबु धाबी पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमधून इंडिकेटर न देता लेन बदलल्यामुळे काय होते हे दिसत आहे. या व्हिडीओ बरोबरच पोलिसांनी लोकांना हायवेवर गाडी चालवताना किंवा लेन बदलताना ही चूक अजिबात करू नका, असे आवाहनही केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या