JOIN US
मराठी बातम्या / Viral / अवघ्या 4 सेकंदामध्ये वाघाने केला हत्तीवर बसलेल्या माहुतावर हल्ला, धडकी भरवणारा VIDEO

अवघ्या 4 सेकंदामध्ये वाघाने केला हत्तीवर बसलेल्या माहुतावर हल्ला, धडकी भरवणारा VIDEO

हत्तीवर कदाचित दोघे जण असतील, असं वाटतंय. कारण तो व्हिडिओ पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने शूट केला आहे.

जाहिरात

हत्तीवर कदाचित दोघे जण असतील, असं वाटतंय. कारण तो व्हिडिओ पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने शूट केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर :  सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. बऱ्याचदा प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्या प्राण्यांमधील लढाई पाहून अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यामध्ये वाघाने हत्तीवर बसलेल्या माहूतावर कसा हल्ला केला हे पाहायला मिळत आहे. हा सर्व प्रकार माहूत हत्तीला शेतात घेऊन जाताना घडला. एका यूजरने या लढाईचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ काहीसा जुना असून तो सध्या व्हायरल होत आहे. त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये हा व्हिडिओ आसाममधल्या काझीरंगा नॅशनल पार्कच्या आसपासचा आहे, असं म्हटलं जातंय. पण हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. तो व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्तीवर बसून समोरून एक तरुण माहूत जात आहे आणि तो एका शेतात पोहोचणार असतो. शेतात पीक उभं दिसतंय, इतक्यात अचानक त्या शेतातून एक वाघ येतो. काही वेळांपूर्वी फक्त पिकं दिसणाऱ्या त्या पिकांमधून तो वाघ बाहेर येताना दिसतो. (अजगराने तोंड उघडताच हरणाला गिळलं, संपूर्ण Video पाहून बसेल धक्का) तो वाघ थेट हत्तीवर बसलेल्या माहुताच्या दिशेने झेप घेतो. तो तरुणही हातातल्या काठीने वाघाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, पण अखेर तो वाघ जोरात उंच उडी घेत त्या माहूतावर हल्ला करतो. दरम्यान, त्या वाघाने हल्ला केल्यानंतर माहुताचं काय झालं, तो बचावला की नाही, वाघाने हत्तीवरही हल्ला केला होता की फक्त त्याने त्या तरुण माहुताची शिकार केली, याबदद्ल कोणतीच कल्पना नाही. कारण तो वाघ माहुतावर हल्ला करतो, तिथेच हा व्हिडिओ संपतो. (Video : ‘यमराज सुट्टीवर होता वाटतं?’’, झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल) हत्तीवर कदाचित दोघे जण असतील, असं वाटतंय. कारण तो व्हिडिओ पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने शूट केला आहे. पण तेवढाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याने त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिक माहिती मिळालेली नाही. खरं तर त्या तरुणाने विचारही केला नसेल, की अशा रितीने पिकांमध्ये दबा धरून बसलेला वाघ त्याच्यावर हल्ला करेल. तो शेतात हत्तीवर बसून गेल्यावर ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटकरी घाबरले आहेत. अनेक जण तो माहूत कसा असेल, याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. तर काहींनी तो बचावला असावा, अशी प्रार्थना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या