JOIN US
मराठी बातम्या / Viral / लघवी करताना जळजळ होते म्हणून रुग्णालयात गेले; 79 वर्षीय आजोबांचा प्रताप पाहून डॉक्टरही हादरले

लघवी करताना जळजळ होते म्हणून रुग्णालयात गेले; 79 वर्षीय आजोबांचा प्रताप पाहून डॉक्टरही हादरले

प्रायव्हेट पार्टची समस्या घेऊन ही वृद्ध व्यक्ती डॉक्टरांकडे केली आणि धक्कदायक सत्य समोर आलं.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकियो, 15 नोव्हेंबर :  लहान मुलं कधी, काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे त्यांनी नाकात एखादं बटण टाकल्याची, नाणं किंवा सेफ्टी पिन गिळल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या असं प्रकरण चर्चेत आलं आहे, जे कोणत्या लहान मुलाचं नाही तर एका वृद्ध व्यक्तीचं आहे. 79 वर्षांच्या या व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टसोबत नको खेळ केला. त्याच्या मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले. जपानच्या टोकियोतील ही धक्कदायक घटना आहे.

मीबूमधील डोक्यो मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एक 79 वर्षांची व्यक्ती आली. या व्यक्तीला लघवी करताना प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ होत होती. त्याने डॉक्टरांना आपली समस्या सांगितली. डॉक्टरांनी त्याच्या वैद्यकीय तपासण्य़ा केल्या. एक्स-रे रिपोर्टमध्ये डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला. त्याच्या मूत्राशयात दोरीसारखं गोलाकार काहीतरी होतं. 3डी स्कॅनमध्ये डॉक्टरांना समजलं की दोरी त्याच्या मूत्राशयात वाकडी होऊन अडकली आहे. ती खेचून काढणं अशक्य होतं. त्यामुळे सर्जरी करावी लागली.

हे वाचा -  रुग्णाला न सांगताच नर्सने कापला पाय; कारण विचारताच ‘कहाणी में ट्वीस्ट’

संबंधित बातम्या

डेली मेलच्या रिपोर्टनुसार यूकेच्या एका डॉक्टराने सांगितलं की त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये असं भयंकर प्रकरण कधीच पाहिलं नाही. डॉक्टरांनी विचारल्यानंतर या व्यक्तीने आपण दोरीउडीची 90 इंच लांब दोरी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्याचं कबूल केलं. अशी आणखी काही प्रकरणं आहेत. याला साऊंडिंग असं म्हटलं जातं. डॉक्टरांनी सांगितलं की सध्या पुरुषांमध्ये साऊंडिंग सामान्य होत चाललं आहे. साऊंडिंग ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात पुरुष आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये एखादी वस्तू टाकतात, ज्यामुळे त्यांचं शरीरा उत्तेजित होईल. (फोटो: Creative Commons via Daily Star)

(फोटो: Creative Commons via Daily Star)

जगभरातील डॉक्टरांनी ही प्रक्रिया खतरनाक असल्याचं सांगितलं आहे. यामुळे मूत्राशयाच्या आतील त्वचेलाही हानी पोहोचू शकते. या व्यक्तीने जो मूर्खपणा केला त्यामुळे त्याचा जीवही गेला असता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या