JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / फोटोतली महिला किती वर्षांची असेल काही अंदाज? Fitness बघून वाटेल हेवा

फोटोतली महिला किती वर्षांची असेल काही अंदाज? Fitness बघून वाटेल हेवा

अडोरा ओकोरो ही एक 60 वर्षांची स्त्री आहे. परंतु ती तिच्या वयाच्या आजीसारखी दिसत नाही. तिचा लूक आणि फिटनेस पाहून अडोराचं वय इतकं आहे यावर क्वचितच कोणाचा विश्वास बसेल. ती इतकी तरुण दिसते की लोक तिची खरी वाढदिवसाची तारीख मान्य करण्यास नकार देतात.

0106

इंग्लंडमधील विरल येथील रहिवासी असलेल्या अडोरा ओकोरोकडे पाहिलं तर ती 40 वर्षांची असेल असंही वाटत नाही. त्यामुळे तिने स्वत: तिचं वय 60 वर्षे सांगितलं तर लोक त्यावर मुळीच विश्वास ठेवत नाहीत. तिच्या डेटिंग प्रोफाइलवर कोणीही तिचं वय खरं असल्याचं मानत नाही.

जाहिरात
0206

अडोरा ओकोरोची सुंदर, तरुण त्वचा आणि रेखीव चेहरा एखाद्याच्या डोळ्यांना फसवण्यासाठी पुरेसे आहेत. ती तिच्या वयापेक्षा जवळपास 30 वर्षांनी लहान दिसते. यामुळे तिच्या मित्रांना तिचा हेवा वाटतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अडोरा यासाठी कधीही बोटॉक्स ट्रीटमेंट किंवा कॉस्मेटिक सर्जरीचा अवलंब करत नाही.

जाहिरात
0306

व्यवसायाने नृत्य शिक्षिका आणि डीजे असलेल्या अडोरा भरपूर पाणी पिऊन स्वतःच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य (hydrated) ठेवतात. तसंच, सूर्यापासून संरक्षण वापरून तिची त्वचा निरोगी ठेवते. ती स्वतः म्हणते की, डेटिंग साइटवर त्यांना 21 वर्षांनी लहान असलेल्या पुरुषांकडून रिक्वेस्ट येतात. इतकंच नाही तर वृद्धत्व रोखणाऱ्या ब्युटी ब्रँडनेही त्यांच्या कँपेनसाठी अडोरा यांना साइन करतात.

जाहिरात
0406

Liverpool ECHO च्या मते, अडोरा लहानपणापासूनच तिच्या त्वचेबद्दल जागरूक होती. मात्र, ती सुरुवातीला खूप हडकुळी होती आणि अंगावर चरबी चढावी म्हणून काहीही खात-पित असे. अडोराच्या म्हणण्यानुसार, तिची आई सुद्धा 30 वर्षांची होईपर्यंत हडकुळी होती आणि नंतर जाड झाली. या वयानंतर अडोराचं वजनही थोडं चांगलं झालं.

जाहिरात
0506

अडोरा यांनी सुरुवातीला वकिलीही केली आहे. त्या फावल्या वेळेत डीजे म्हणून काम करतात. त्यांची जीवनशैलीही 30 वर्षांच्या लोकांप्रमाणे उर्जेने परिपूर्ण आहे. त्या त्यांच्या तरुण लूकबद्दल बोलताना म्हणतात की, त्यांचा फक्त निरोगी राहण्यावर विश्वास आहे. इतर सर्व गोष्टींप्रमाणे आपल्या शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं त्या म्हणतात.

जाहिरात
0606

अडोरा यांचे पती पॉल यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आणि तेव्हापासून त्यांनी स्वतःला विविध मार्गांनी कामात व्यग्र ठेवलं. त्या दररोज सकाळी फळं आणि भाज्यांचे रस पितात आणि शाकाहारी आहार घेतात. त्या म्हणतात की, दिवसातून 3 लिटर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे आणि नियमित व्यायामामुळे व्यक्ती फिट राहते. अडोरा म्हणतात की, शरीराने निरोगी असलेली व्यक्ती जीवनात सर्व काही करू शकते. , (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@eudoraokoroandrew)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या